रविवारी १९ पाॅझिटिव्ह, तर १७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST2021-07-19T04:19:00+5:302021-07-19T04:19:00+5:30

बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सहा, बल्लारपूर एक, भद्रावती तीन, नागभीड एक, गोंडपिपरी चार, वरोरा तीन, कोरपना एक, ...

Sunday 19 positive, 17 coronal free | रविवारी १९ पाॅझिटिव्ह, तर १७ कोरोनामुक्त

रविवारी १९ पाॅझिटिव्ह, तर १७ कोरोनामुक्त

बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सहा, बल्लारपूर एक, भद्रावती तीन, नागभीड एक, गोंडपिपरी चार, वरोरा तीन, कोरपना एक, ब्रह्मपुरी, चंद्रपूर तालुका, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, राजुरा, चिमूर, जिवती या तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ९३१ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ६२३ झाली आहे. सध्या १३५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ३०३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यांपैकी ५ लाख ५ हजार ९७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहेत.

Web Title: Sunday 19 positive, 17 coronal free