शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या

By admin | Updated: July 2, 2014 23:17 IST

ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. मात्र या योजना आता

संस्थेने प्रवेश नाकारला: चंद्रपूर, नागपूर येथील शाळांत प्रवेश देण्याची मागणीचंद्रपूर : ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. मात्र या योजना आता त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. दरम्यान बुधवारी विद्यार्थ्यांनी आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पालकांनी विभागाकडून सुचविलेल्या कोरपना, राजुरा येथील शाळा नाकारल्या असून चंद्रपूर किंवा नागपूर येथील शाळांमध्ये प्र्रवेश देण्याची मागणी केली आहे. दरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे. येथील आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत मॅक्रुन स्टुडंट अ‍ॅकेडमीच्या संस्थापकावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत १२३ विद्यार्थ्यांना निवासी इंग्रजी शिक्षणासाठी येथील मॅक्र्रुन स्टुडंट अ‍ॅकेडमीमध्ये प्रवेश दिला. या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत होते. तसा शासनासोबत या संस्थेने करारही केला आहे. मात्र सदर संस्थेने देण्यात येणारा निवासी भत्ता परवडत नसल्याचे कारण सांगून पालकांनी शाळेतून विद्यार्थ्यांना काढण्याचे सांगितले. आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासन ३२ हजार ५०० रुपये प्रती विद्यार्थी एका वर्षांसाठी खर्च करते. मात्र हा निधी परवडत नसल्याचे संस्थेने शासन तसेच आदिवासी विकास विभागाला कळविले आहे. मात्र यावर कोणतेही उपाययोजना करण्यात न आल्याने संस्थेने विद्यार्थ्यांच्या पालकांना टीसी घेऊन जाण्याचे सांगितले. बुधवारी काही पालकांनी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गाठून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला. आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांसाठी कोरपना तालुक्यातील स्कॉलर्स सर्च अ‍ॅकाडमी तसेच राजुरा तालुक्यातील इंफट जिजस कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशासाठी निवड केली. मात्र या शाळांत विद्यार्थ्यांना प्रवेश न देता चंद्रपूर किंवा नागपूर येथील शाळांत प्रवेश द्यावा, अशी मागणी पालकांनी रेटून धरली. (नगर प्रतिनिधी)