शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रिदनुसार एसटी धावून गेली आणि पुन्हा आगारात मुक्कामाला आली. एसटी बंद असल्यामुळे विविध घटकांतील प्रवाश्यांना एसटीच्या योजनांपासून मुकावे लागण्याची भीती होती.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये प्रवाशांना दिलासा । वंचित घटकांना आता योजनेचा घेता येणार लाभ

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे आगारात अडकून पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाश्यांना दिलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत प्रवाश्यांचे हित जपले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाखो सामान्य प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रिदनुसार एसटी धावून गेली आणि पुन्हा आगारात मुक्कामाला आली. एसटी बंद असल्यामुळे विविध घटकांतील प्रवाश्यांना एसटीच्या योजनांपासून मुकावे लागण्याची भीती होती. राज्यात एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ घटकांना ३३ टक्क््यांपासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवाश्यांनी आधार क्रमांकाशी लिंक असलेले स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक आहे. लॉकडाऊनपूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती. मात्र २१ मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांना स्मार्टकार्डसाठीची प्रक्रिया या कालावधीत करता आली नाही. यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर या प्रवाश्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्यांना अद्यापही स्मार्ट कार्ड काढता आले नाही त्यांच्यासाठीही ही बाब दिलासादायक आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यांतर्गंत बस सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रवाश्यांचा अत्यल्प प्रतिसाद असला तरी भविष्यात प्रवाशी वाढतील, असा अंदाज महामंडळाने व्यक्त केला आहे.एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच मुदतवाढ दिली होती. लॉकडाऊनमुळे अनेकांना एसटी महामंडळाच्या सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्टकार्ड काढता आले नाही. ही बाब विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने स्मार्टकार्ड काढण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.- आर. एन. पाटील,विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

टॅग्स :state transportएसटी