शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने छप्परे उडाली

By admin | Updated: June 8, 2014 23:47 IST

वरोरा तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यात वरोरा शहरातील शासकीय निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीमधील घरांचे छप्परे उडाली तर वीज पडून एका

वीज पडून एकाचा मृत्यू : घरातील साहित्याची नासधूसवरोरा :  वरोरा तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यात वरोरा शहरातील शासकीय निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीमधील घरांचे छप्परे उडाली तर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. पावसाने अनेक झाडे उलमडून पडल्याने विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी खंडीत झाला होता. वीज अधिकारी व कर्मचार्‍यांनी रात्रभर परिश्रम घेत वीज पुरवठा सुरळीत केला.वरोरा तालुक्यात शनिवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने  हजेरी लावली. रात्री ७  वाजताच्या सुमारास वीज पडल्याने जामगाव (बु.) येथील दिलीप माणिक  कळस्कर (२५) हा युवक जागीच ठार झाला. त्याच्या सोबत असलेला  एक जण गंभीर जखमी झाला. परंतु त्याचे नाव मात्र कळू शकले नाही. वरोरा शहरातील पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानावरील टिनाचे छप्पर  उडाले. त्यामुळे सिलिंग तुटून खाली पडले. छप्पर उडाल्याने पावसात घरातील साहित्याची नासधूस झाली. शहरातील अनेक भागातील झाडे वीज तारावर पडल्याने अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. वीज अधिकारी व कर्मचार्‍यांनी शर्थीने प्रयत्न करीत रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत केला.  (तालुका प्रतिनिधी)