शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणे बंद करा

By admin | Updated: October 29, 2015 01:34 IST

दिवसेंदिवस शिक्षकांवर अशैक्षणिक कामे देऊन कामाचा बोझा वाढवत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.

तहसीलदारांना निवेदन : अखिल प्राथमिक शिक्षक संघाची मागणीभद्रावती : दिवसेंदिवस शिक्षकांवर अशैक्षणिक कामे देऊन कामाचा बोझा वाढवत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याचे काम रद्द करण्यात यावे, यासाठी अखिल भद्रावती प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याचे कामे करण्याविषयी प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु शासन परिपत्रक क्र.आरटीई २०१३ प्र.क्र. १३२१ प्रशिक्षण मंत्रालय विस्तार भवन मुंबई २०१३ आरटीई अ‍ॅक्ट २००९ मधील प्रकरण चारमधील कलम (२७) शासन निर्णय क्रमांक १३ जून २०१० नुसार निवडणूक वगळता इतर कोणत्याही प्रयोजनार्थ राज्य शासन, स्थानिक स्वराज्यसंस्था अथवा खासगी संस्थेद्वारे प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना सेवेत वापरण्यात येवू नये असे स्पष्ट नमूद केले आहे. तसेच शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे रद्द करण्याचे आदेश दिले आहे. शिक्षकांच्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कालावधी दरम्यान शालेयस्तरावर संकलित मुल्यमापन क्र. १ (प्रथम सत्रपरिक्षा) तसेच नवचेतना मिशन अंतर्गत गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडविण्याचे आव्हान शिक्षकांच्या पुढे आहे. परंतु शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाच्या व्यापामुळे शिक्षकांचे विद्यार्थी घडविण्याचे मिशन अयशस्वी होताना दिसत आहे. त्यासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये या मागणीसाठी अखिल भद्रावती प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार राजू पढाले यांनी निवेदन स्वीकारले. (शहर प्रतिनिधी)