State Drama Contest Page of Maharashtra's cultural heritage | राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे मानाचे पान

राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे मानाचे पान

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ५९ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेली हौशी राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे मानाचे पान आहे. नाटकाची ही कला पारदर्शी कला आहे. या स्पर्धेत अभिजात कला सादर होणार आहेत. काही सामाजिक आशयाची नाटके सुध्दा सादर होणार आहे. नाट्यकलेची जोपासना करणाऱ्या सर्व कलावंतांनी गेली अनेक वर्षे परिश्रम घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक संपन्न केली असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले.
येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ५९ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी सुनिल देशपांडे, चित्रपट दिग्दर्शक शैलेश दुपारे, परिक्षक नंदकुमार सावंत (मुंबई), अ‍ॅड. सुजाता पाठक (औरंगाबाद), सुधाकर गीते (अकोला) यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पहिली घंटा वाजवून स्पधेर्चे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना चित्रपट दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी स्पर्धेत सादर होणाºया सर्व नाटकांचे अवलोकन करून त्यांच्या आगामी चित्रपटात काही कलावंतांना संधी देण्यात येईल, अशी भूमीका जाहीर केली.
संचालन व आभार स्पर्धेचे समन्वयक सुशिल सहारे यांनी केले. उद्घाटन समारंभानंतर वर्धा येथील संघाने सादर केलेल्या ‘रातमतरा’ या नाटकाचे सादरीकरण झाले. या स्पर्धेत ३० नोव्हेंबरर्पंत १२ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. नाट्यगृहात प्रवेशताना सादर होणाºया सर्व नाटकांची माहिती देणारी एक आकर्षक दिवटी व रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

१२ नाटकांची नाट्यरसिकांना मेजवानी
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण १२ नाटकांचा समावेश असून यामध्ये १९ नोव्हेंबर रोजी अनफेअर डिल, २० नोव्हेंबर त्वचेचिया राना, २१ नोव्हेंबर काली, २२ नोव्हेंबर दुसरा अंक, २३ नोव्हेंबर अम्मी, २६ नोव्हेंबर कातरवेळ, २७ नोव्हेंबर हॅलो राधा मी रेहाना, २८ नोव्हेंबर काय डेंजर वारा सुटलाय, २९ नोव्हेंबर आखेट, ३० नोव्हेंबर मोरूची मावशी आदी नाटकांचा यात समावेश आहे. ही सर्व नाटक सायंकाळी ७ वाजता प्रदर्शीत करण्यात येणार असून याचा रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: State Drama Contest Page of Maharashtra's cultural heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.