शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

घोडाझरी उपकालव्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:14 AM

गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याचे बंद झालेले काम सुरू झाले आहे. शासनाकडून देयके अदा होत नसल्याच्या सबबीवरून याअगोदरच्या कंत्राटदार कंपन्यांनी काम बंद केले होते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याचे बंद झालेले काम सुरू झाले आहे. शासनाकडून देयके अदा होत नसल्याच्या सबबीवरून याअगोदरच्या कंत्राटदार कंपन्यांनी काम बंद केले होते.गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी या कालव्याचे काम सुरु करण्यात आले होते. तत्पूर्वी या कालव्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती आणि काम धडाक्यात सरु करण्यात आले होते. हे काम करण्यासाठी खडकी (मेंढा ), नवेगाव पांडव, खैरीचक व कोदेपार येथे कंत्राटदार कंपन्यानी आपले युनिट सुरु केले होते. काही दिवस हे काम सुरळीत सुरु राहिले. पण नंतर शासनाने आर्थिक बाबतीत आपले हात आखडते घेणे सुरु केल्याने या कंत्राटदार कंपन्यासमोर मोठा बिकट प्रसंग सुरु झाला.अशाही अवस्थेत काही कंपन्यानी काम सुरुच ठेवले तर काही कंपन्यानी काम बंद केले. नवेगाव पांडव येथील कंपनीने तर लाखो रुपये खर्च करुन उभारलेले युनिटच येथून हलविले होते. दरम्यान, २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. भाजप-सेना युतीचे शासन राज्यात सत्तारुढ झाले. या सत्तांतराने तरी या कालव्याच्या मागे लागलेली साडेसाती संपेल, अशी अपेक्षा होती. पण या कालव्याच्या नशिबी असलेला भोग संपला नाही.या कालव्याचा बहुतांश भाग नागभीड तालुक्यातून गेला आहे. मात्र तालुक्यातील शेतीला सकृतदर्शनी या कालव्याचा काहीच लाभ होत नाही. नागभीड तालुक्यातून गेलेला हा कालवा पूर्णत: भूमिगत स्वरूपाचा आहे. पण मागेपुढे या कालव्याचे काम पूर्ण झालेच आणि येथून पाणी जाऊ लागले तर लिफ्ट इरिगेशनसारखी योजना कार्यान्वित होऊ शकेल, या आशेवर या तालुक्यातील शेतकरी आहेत.या पार्श्वभूमीवर या कालव्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. खडकी (मेंढा), कोर्धा, कोदेपार येथे या कालव्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी आपले बस्तान बसवले असून कामही सुरू केले आहे. 

टॅग्स :Ghodazari Damघोडाझरी धरणGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प