शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बार मालकांकडून जुन्या सहकाऱ्यांना बोलावणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:21 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर दारू व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आपल्या जुन्या सहकाऱ्यांना आता बोलावणे सुरू केले आहे. दरम्यान, ...

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर दारू व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आपल्या जुन्या सहकाऱ्यांना आता बोलावणे सुरू केले आहे. दरम्यान, बार, वाॅईनशाॅप असलेल्या जुन्या दुकानातील धूळ साफ करणेही सुरू केले आहे. भविष्यातील दिवस सुगीचे असेल, अशी अनेकांनी आशा व्यक्त केली आहे.

औद्योगिक जिल्हा असल्याने दारू व्यावसायिकांना पूर्वी सुगीचे दिवस होते. मात्र दारूबंदी झाल्यानंतर या व्यवसायातील काहींना आपल्याकडील मालमत्ता विकून कर्ज भरावे लागते तर काहींनी अन्य व्यवसायाला पसंती दिली आहे. मात्र या व्यवसायात पैसा अधिक असल्यामुळे दुसऱ्या व्यवसायात बहुतांश जणांचे मनच रमले नाही. दरम्यान, राज्य शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेताच या व्यावसायिकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. विशेष म्हणजे, बेरोजगार झालेले तसेच विविध ठिकाणी कामासाठी गेलेल्या आपल्या जुन्या आणि विश्वासू सहकाऱ्यांनाही बोलावणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, बंदी हटताच या व्यवसायाशी निगडित अन्य नागरिकांनी व्यावसायिकांच्या भेटीगाठीही घेणे सुरू केले असून किमान आता सुगीचे दिवस येतील, अशी त्यांना आशा आहे.

बाॅक्स

अनेकांनी विकल्या मालमत्ता

दारूबंदी झाल्यानंतर अनेकांना जगणे कठीण झाले होते. व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगार होण्याची वेळ त्यांच्यावर आली. घेतलेले कर्ज कसे भरावे या विवंचनेत अनेकांनी स्वत:कडील मालमत्ता विकल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. तर काहींनी यातून सावरत नवनवे व्यवसाय सुरू केले.

बाॅक्स

अशी होती संख्या

देशी दारूची दुकाने १०६

वाईन शाॅप २४

बार- ३१३

बिअर शाॅपी ५१

बाॅक्स

चढाओढ सुरू

बार, बिअर शाॅपी चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार लागतात. विशेष म्हणजे, या कामात तरबेज असलेल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून यासाठी चढाओढही लागली आहे. काहींनी तर अन्य जिल्ह्यातील कामगारांना बोलावण्याची तयारी सुरू केली आहे.