शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केवळ हैद्राबादसाठीच एसटीचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

चंद्रपूर आगारातुन लांब पल्ल्याच्या माेजक्या फेऱ्या आहे. यामध्ये वाशिम, गोंदिया, भंडारा, अहेरी, नागपूर, अमरावती, अकोला, हैद्राबाद, आदिलाबाद आणि गडचिरोलीला जाण्यासाठी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. लांब प्रवासासाठी काही प्रमाणात  प्रवाशी बुकींग करीत आहेत. मात्र मागील वर्षिच्या तुलनेत यावेळी  प्रवाशांचा प्रतिसाद नाही.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट, वैयक्तिक वाहनांनी जाणाऱ्यांची संख्या अधिक

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  दिवाळीनंतर आता गावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून त्यांची धावपळ सुरू झाली आहे. लांब पल्ल्याच्या बसची ऑनलाईन आरक्षण सुविधा काही प्रवासी घेत आहे. तरी मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आरक्षण करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ हैद्राबाद, आदिलाबाद, वाशिम, अकोला, अमरावतीसाठीच आरक्षण केले जात आहे.दिवाळीच्या दिवसामध्ये चंद्रपूर   आगारामध्ये दररोज ८ ते १०  प्रवासी बुकिंग करीत असल्याची माहिती महामंडळाने दिली.परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर  विभागाने यावर्षी राजुरा आगाराने पुणेसाठी बस सोडली आहे. तर अन्य आगारांनी हैद्राबाद, आदिलाबाद, तसेच लांब पल्याच्या बस सोडल्या आहे. मागील काही वर्षाचा अनुभव बघता पुणेसाठी आरक्षण केले जात आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. राजुरा येथून पुणेसाठी सोबतच चंद्रपूर आगारातून वाशिम, अकोला, अमरावतीसाठी एसटी सोडण्यात येत आहेत. दरम्यान,  आर्थिक डबघाईस आलेल्या एसटीला दिवाळीमुळे प्रवाशी मिळत असून काही प्रमाणात का, होईना  आर्थिक लाभ  मि‌ळत आहे.

लांब पल्ल्याच्या फेऱ्याचंद्रपूर आगारातुन लांब पल्ल्याच्या माेजक्या फेऱ्या आहे. यामध्ये वाशिम, गोंदिया, भंडारा, अहेरी, नागपूर, अमरावती, अकोला, हैद्राबाद, आदिलाबाद आणि गडचिरोलीला जाण्यासाठी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. लांब प्रवासासाठी काही प्रमाणात  प्रवाशी बुकींग करीत आहेत. मात्र मागील वर्षिच्या तुलनेत यावेळी  प्रवाशांचा प्रतिसाद नाही.

हैद्राबाद, अमरावतीसाठी अधिक फेऱ्याहैद्राबाद, अमरावती, नागपूरसाठी अधिक फेऱ्या सोडल्या जात आहे. सुटीचा कालावधी आता संपण्याच्या मार्गावर असल्याने एसटीमध्ये गर्दी होऊ नये यासाठी अधिक बस सोडल्या जात आहे. यासोबतच आदिलाबाद, गडचिरोलीसाठीही बस फेऱ्या आहेत.  तर नागपूरवरून पुणेसाठी बस असल्याने नागपूरसाठी अतिरिक्त बस सोडल्या जात आहे.परतीच्या प्रवासाची अशी आहे स्थितीचंद्रपूर आगारातून प्रामुख्याने हैद्राबाद, आदिलाबाद, अकोला, अमरावतीसाठी बस आहे. हैद्राबाद येथून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या प्रवाशांना ऑनलाईन आरक्षण बुकींग केले आहे. अनेकांनी खासगी सेवेपेक्षा एसटीच्या सेवेलाच अधिक पसंती दिली आहे.वैयक्तिक वाहनांना अधिक पसंतीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बहुतांश प्रवासी खासगी किंवा एसटीने प्रवास न करता वैयक्तिक वाहनांना पसंती देत आहेत. चारचाकी, दुचाकीद्वारे  प्रवास करणे सुरक्षित मानत आहे. दुचाकीवर तसेच खासगी कारने प्रवास करणाऱ्यांचा अधिक भर आहे.

टॅग्स :state transportएसटी