स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 05:00 AM2020-03-23T05:00:00+5:302020-03-23T05:00:15+5:30

जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादासंदर्भात आढावा घेताना खेमनार यांनी रविवारी सायंकाळी उच्चस्तरीय आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

Spontaneous 'corona' closure! | स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

Next
ठळक मुद्देसर्वत्र शुकशुकाट, रस्ते निर्मनुष्य : चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व गावात स्मशानशांतता, केवळ मेडिकल व पेट्रोलपंपच सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. विदेशातून आलेल्या एका रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. आता निगराणीत असणाऱ्या विदेशातून आलेल्या रुग्णांची संख्या ३१ आहे. १२ नागरिकांना १४ दिवसांचा अवधी झाल्यामुळे निगराणीबाहेर करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या जनता कफ्यूर्ला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रपूरसह जिल्हाभरात ही संचारबंदी दिसून आली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रात्री ९ वाजेपर्यंत असलेली ही जनतेची संचारबंदी वाढवून पहाटे ५ वाजेपर्यंत केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत जनतेने विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादासंदर्भात आढावा घेताना खेमनार यांनी रविवारी सायंकाळी उच्चस्तरीय आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत असणारी आरोग्य यंत्रणेकडून औषध उपलब्धता व संभाव्य परिस्थितीत लागणारे उपकरणे औषधी यासंदर्भातला आढावा घेण्यात आला.
सोमवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. उद्या सकाळी ते विविध ठिकाणी पाहणी करणार आहे.
दरम्यान रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कालपर्यंत ४४ तर आज ३१ विदेशातून आलेले नागरिक निगराणीमध्ये आहेत. यामध्ये रविवारी बेल्जियमवरून आलेल्या एका नागरिकाची भर पडली आहे. सोबत रशिया आणि थायलंडवरून आठ जण आले आहे. त्याची तपासणी सुरू आहे. विदेशातून आलेल्या यापूर्वीच्या १२ लोकांनी १४ दिवस तपासणी पूर्ण केली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जिल्ह्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तथापि पुणे, मुंबई येथून आलेल्या सर्व प्रवाशांनी पुढील १४ दिवस घरीच आपल्या कुटुंबापासूनदेखील अलिप्त राहावे, आरोग्याबाबत कोणतीही शंका असल्यास अधिक माहितीसाठी व मदतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
सोमवारपासून देखील पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यामध्ये १४४ कलम कायम लागू राहणार आहे. जमावबंदी लागू असल्यामुळे आवश्यकता असल्याशिवाय कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काळामध्ये जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात एकाच वेळी फवारणी करण्यासंदर्भातही कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत यांच्या ताब्यात असणाºया फवारणी यंत्रणा, फॉगिंग मशीन अद्ययावत ठेवण्याची, दुरुस्त ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. तेलंगणा-महाराष्टÑ राज्याची सीमा प्रतिबंधित करण्यात आली आहे.

चंद्रपूर : सध्या देशात कोरोना व्हायरसने आपली पायमुळे रोवणे सुरू केले आहे. यावर आताच पायबंद बसविण्यासाठी व बाधितांची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेचा कर्फ्यू घोषित करीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. चंद्रपुरातील सर्व रस्ते रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत निर्मुनष्य होते. बाजारपेठात स्मशानशांतता होती. मात्र चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एखादा नागरिक रस्त्यावरून फिरताना दिसला की पोलीस त्याला अडवून बाहेर पडण्याचे कारण विचारत होते.

जनतेचे आभार
शासनाने आवाहन केल्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने जनतेचा कर्फ्यू यशस्वी केला. यातून आपणाला सर्वांनाच फायदा होणार आहे. येणारा काळ कठीण आहे. त्यामुळे जनतेने पुढेही स्वयंशिस्त अशी कायम ठेवावी. संशयित आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी. - डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

शिस्त पाळावी
बाहेर राज्यातील कुणीही जिल्ह्यात प्रवेश करू नये, यासाठी आंतरराज्यीत सर्व सीमा बंद केल्या आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाच जिल्ह्यात होऊ दिला जात आहे. शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.
- डॉ. महेश्वर रेड्डी,
जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.
 

Web Title: Spontaneous 'corona' closure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.