शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यरत नसतानाही आयुक्तांना चंद्रपूर मनपाकडून वेतन

By admin | Updated: June 25, 2015 01:22 IST

शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या नव्या निविदेत जादा दराने निविदा दिल्याचे कारण पुढे करून कंत्राटदारास वेठीस ...

रजेचा पगार चंद्रपुरातून : जळगाव येथे बदली झाल्यानंतर घेतली होती रजा चंद्रपूर : शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या नव्या निविदेत जादा दराने निविदा दिल्याचे कारण पुढे करून कंत्राटदारास वेठीस धरून चंद्रपूरकरांचा पैसा वाचविण्यासाठी धडपडणारे चंद्रपूरचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी स्वत: मात्र चंद्रपूरकरांच्या सेवेत नसतानाही चंद्रपूर महानगरपालिकेकडून तब्बल ६ लाख रुपयांचे वेतन घेतले असल्याची बाब उजेडात आली आहे. आता चंद्रपूरकरांच्या हिताची नेमकी काळजी कुणाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी दिली.आयुक्त सुधीर शंभरकर यांनी चंद्रपूर मनपाकडून घेतलेले वेतन नियमाला अनुसरून असले तरी ज्या कालावधीतील हे वेतन काढण्यात आले, त्या कालावधीत तत्कालीन आयुक्त बोखड हे चंद्रपुरात कार्यरत होते. बोखड यांनाही त्याच कालावधीत वेतन देण्यात आले आहे. मग बोखड यांच्या कालावधीत वेतन देण्यात आले असताना विद्यमान आयुक्त सुधीर शंभरकर यांनाही त्याच कालावधीचे वेतन चंद्रपूर महानगरपालिकेने केवळ रजा परावर्तीत या सबबीखाली दिले आहे. आयुक्त सुधीर शंभरकर हे परभणी येथे आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांची जळगाव महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून शासनाने बदली केली. मात्र शंभरकर यांनी जळगाव येथे रूजू न होता ते सुटीवर गेले. हा सुट्टयांचा कालावधी जवळपास ९ महिन्यांचा होता. इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या सुट्टयानंतर त्यांची चंद्रपूर महानगरपालिकेत बदली झाली. मात्र ज्यावेळी ते सुट्टयावर होते त्यावेळी चंद्रपूरला आयुक्त म्हणून बोखड कार्यरत होते. बोखड सेवानिवृत्त झाल्यानंतर शंभरकर यांची चंद्रपूरला बदली झाली व ते येथे रूजू झाले.दरम्यान, आयुक्त सुधीर शंभरकर यांनी शासनास रजा मंजूर करण्याबाबतचे पत्र लिहिले व या पक्षाला अनुसरून नगरविकास खात्याच्या अप्पर सचिवांनी २९२ दिवसांच्या रजा मंजूर केल्यात.आयुक्तांना रजेचा पगार देणे नियमात बसणारे असले तरी एकाच कालावधीत मनपाने दोन आयुक्तांना दिलेले वेतन चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)ही कसली काटकसर ?राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे एकीकडे राज्य कर्जबाजारी आहे, असे सांगत काटकसरीचे धोरण अवलंबित असताना त्यांच्याच राज्यात तब्बल २९२ दिवस रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना वेतन दिल्या जात असेल तर या धोरणाचा उपयोग काय, असा प्रश्न आता चंद्रपूर महानगरपालिकेतील नगरसेवक उपस्थित करू लागले आहेत. आयुक्त म्हणून चंद्रपुरात सेवेत नसतानाही चंद्रपूरकरांच्या कराचा पैसा विद्यमान आयुक्तांना वेतन म्हणून देण्यात आला असल्याने आता नगरसेवकांमध्ये यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. जनतेचा पैसा स्थानिक विकासासाठी न वापरता या पैशातून अधिकाऱ्यांना खुश करण्याचे धोरण असल्याची टिका होत आहे.