शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही नगरपंचायतीच्या हालचालींना वेग

By admin | Updated: December 18, 2015 01:25 IST

सिंदेवाही ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंदेवाही : सिंदेवाही ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभाग सचिवाशी चर्चा केल्याची माहिती असून नगरपंचायतीची घोषणा अधिवेशनाच्या सरतेशेवटी होण्याची शक्यता आहे.सिंदेवाही नगरपंचायतीसाठी काही त्रुट्या होत्या. त्या दूर करण्यात आल्याने व ग्रामपंचायत निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकल्याने शासनाला नगरपंचायत घोषीत करण्यास काही हरकत नसल्याकारणाने अधिवेशनच्या सरतेशेवटी राज्यातील दहा ते बारा तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. गत एक वर्षापासून सिंदेवाही ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे. त्यामुळे शेकडो समस्या जैसे थे आहेत. पाहिजे त्याप्रमाणे विकास होत नसल्याकारणाने सिंदेवाही नगरपंचायत होणे आवश्यक आहे. सिंदेवाही तालुका संघर्ष समिती व सर्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रितपणामुळे सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे शासनाने हा नागरिकांचा संदेश असल्यामुळे कोणतेही राजकारण न करता नगरपंचायत करण्यास काही हरकत नसल्याचे सांगण्यात येते. नुकतेच त्यांनी तहसील विभाग व जिल्हाधिकाऱ्यांशी हितगुज केल्याची माहिती असून हिवाळी अधिवेशनच्या सरते शेवटी सिंदेवाही नगरपंचायतीची घोषणा होण्याची शक्यता असून चार दिवसांतच चित्र स्पष्ठ होणार आहे. (शहर प्रतिनिधी)