डायरेक्ट पॅडीसिडरद्वारे चिखलावर धान पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:57+5:30

डायरेक्ट पॅडीसीडर वापरताना रोपवाटीका तयार करण्याची गरज नाही. चिखलणी केल्यानंतर एक दिवस चिखल जमु द्यायचे व त्यानंतर त्यात सरळ अंकुरीत धान पेरणी करता येते. उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे व्यवस्थापन करता येते. ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करण्यास अडचणी येत नाही. डायरेक्ट पॅडीसिडरमुळे मजुरांवरील खर्च कमी होतो.

Sowing of paddy on mud by direct pedicider | डायरेक्ट पॅडीसिडरद्वारे चिखलावर धान पेरणी

डायरेक्ट पॅडीसिडरद्वारे चिखलावर धान पेरणी

googlenewsNext
ठळक मुद्दे लागवड खर्चात होणार बचत : हत्तीबोडी येथील अर्ध्या एकर शेतीत प्रयोग

सुरेश कोमावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : भात पिकाचा लागवड खर्च व मजुरीत काटकसर करण्यासाठी सिंदेवाही येथील कृषी संशोधन केद्र अंतर्गत डायरेक्ट पॅडीसीडर यंत्राचे सहाय्याने चेक हत्तीबोडी येथील शेतकरी आनंदराव बावणे यांनी अर्ध्या एकर शेतीत हा प्रयोग केला आहे.
भात रोवणी करण्यासाठी पोंभुर्णाचे तालुका कृषी अधिकारी व अन्न सुरक्षा दलाच्या प्रशिक्षकांनी संजीवनी कृषी सप्ताह कार्यक्रमातून या नाविण्यपूर्ण प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांना दिली.
डायरेक्ट पॅडीसीडर वापरताना रोपवाटीका तयार करण्याची गरज नाही. चिखलणी केल्यानंतर एक दिवस चिखल जमु द्यायचे व त्यानंतर त्यात सरळ अंकुरीत धान पेरणी करता येते. उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे व्यवस्थापन करता येते. ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करण्यास अडचणी येत नाही. डायरेक्ट पॅडीसिडरमुळे मजुरांवरील खर्च कमी होतो. रोवणीकरीता रोपे तयार करणे, रोपे काढणे, मुख्य शेतात पसरविणे व रोवणी करणे इत्यादी कामावरील हेक्टरी ६ हजार ३०० रूपयांची बचत होते.
हेक्टरी बियाणे व विरळणीचे खर्चही कमी होतो. रोवणी केलेल्या धानापेक्षा डायरेक्ट पॅडीसिडरणे पेरणी केलेले पीक ७ ते १० दिवस लवकर परिपक्व होवून लवकर काढणीला येतो. यावेळी पंचायत समिति सभापती अलका आत्राम, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप बारामते, प्रशिक्षणार्थी गुणवंत मोरे, मुन्ना लोणारे, प्रशांत कावटकर, प्रगतशील शेतकरी सुनील निमसरकार उपस्थित होते.

दिवसभरात एक हेक्टर रोवणी
डायरेक्ट पॅडीसिडर वजनाने हलके असल्यामुळे हाताळणी करण्यास सोपे असते. एक दिवसात एक हेक्टर क्षेत्र पेरणी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते. चेक हत्तीबोडी येथील शेतकरी आनंदराव बावणे यांच्या शेतातहा प्रयोग यशस्वी झाल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या यंत्राबाबत माहिती घेणे सुरू केले आहे.

डायरेक्ट पॅडीसिडर यंत्राच्या सहाय्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च खूपच कमी येतो. पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा वाढविता येईल, यादृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
- शहाजी शिंदे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, पोंभुर्णा

Web Title: Sowing of paddy on mud by direct pedicider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.