As soon as the elections are over, the Zilla Parishad will run | निवडणूक आटोपताच जिल्हा परिषदेत रेलचेल
निवडणूक आटोपताच जिल्हा परिषदेत रेलचेल

ठळक मुद्देकामकाज सुरू : पदाधिकारी-अधिकाऱ्यांची वाहने पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदकडे बहुतांश पदाधिकारी फिरकलेच नव्हते. तर अधिकारी- कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजांवर परिणाम झाला होता. जवळपास महिनाभर जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प असल्यागत स्थिती होती. बुधवारपासून जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरु केले. नागरिकांनीही विविध कामांसाठी गर्दी केली. तर पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे वाहने परत मिळाली.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषद सदस्य नेत्यांच्या प्रचारात व्यस्त होते. विशेष म्हणजे, एका विद्यमान पदाधिकाºयांनीही विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेही प्रचारसभेमध्ये व्यस्त होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत फारसे लक्ष नव्हते. आता मात्र नागरिकांसह कर्मचाऱ्यांची एकच गर्दी दिसून येत आहे. जिल्हा परिषदेतील ६० टक्के अधिकारी- कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले होते. उर्वरित कर्मचाऱ्यांना निमित्त मिळाल्यामुळे त्यांच्याकडून फारशी कामे झाली नाहीत. आचारसंहिता संपल्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी होती. सुटी संपल्यामुळे आता जिल्हा परिषदकडे कर्मचारी वळले असून नागरिकांच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.

कंत्राटदारांची गर्दी वाढली
विधानसभा निवडणुच्या आचारसंहितेमुळे कंत्राटदारांची अनेक बिले आचारसंहितेपूर्वी काढण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काहींचे बिल अडली होती. आता पुन्हा बिले काढण्यासाठी कंत्राटदारांनी प्रयत्न सुरु केले असून प्रत्येक विभागामध्ये कंत्राटदारांची गर्दी बघायला मिळत आहे. मात्र काही विभागप्रमुख अद्यापही सुटीवर असल्याने ते आल्यानंतर त्यांचे बिले मंजूर होणार आहे.

Web Title: As soon as the elections are over, the Zilla Parishad will run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.