सामाजिक संघटनेचा आंदोलनाला पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:30 IST2021-02-11T04:30:38+5:302021-02-11T04:30:38+5:30

महर्षी वाल्मीकी चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी चंद्रपूर : वाल्मिकी सुदर्शन मखीयार समाज विकास संघाच्या गठित नवनियुक्त संघटनेने महपौर राखी ...

Social organization support the movement | सामाजिक संघटनेचा आंदोलनाला पाठींबा

सामाजिक संघटनेचा आंदोलनाला पाठींबा

महर्षी वाल्मीकी चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी

चंद्रपूर : वाल्मिकी सुदर्शन मखीयार समाज विकास संघाच्या गठित नवनियुक्त संघटनेने महपौर राखी कंचर्लावार यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी महर्षी वाल्मिकी चौकाचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन महपौर राखी कंचर्लावार यांनी दिले. यावेळी संघटनेचे लखन सारवान, राजू राठोड, चंद्रशेखर मलीक, रमे रगडे, सचिन सारवान आदी उपस्थित होते.

वरुर येथे प्रबोधन कार्यक्रम

राजुरा : तालुक्यातील वरुर रोड येथे जगतगुरु संत तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय येथे प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संगिता कोडापे, संगिता भंडारे, बेबीनंदा बोरकर उपस्थित होते. यावेळी सीटीपीएसचे उपकार्यकारी अभियंता इंजि दिनेश डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक, संचालन विशाल शेंडे यांनी केले.

Web Title: Social organization support the movement