शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:47+5:302021-09-11T04:27:47+5:30

केंद्र शासनाच्या हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या संकल्पनेवर आधारित १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये घोषवाक्य लेखन ...

Slogan writing competition for sustainable cleanliness | शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धा

शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धा

केंद्र शासनाच्या हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या संकल्पनेवर आधारित १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये घोषवाक्य लेखन स्पर्धा सर्व ग्रामपंचायती, वाडी व वस्तींमध्ये होणार आहे.

यामध्ये शौचालयाचा नियमित वापर, लहान बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबर्धन ओला, सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छताविषयक संदेश असलेल्या घोषवाक्यांचे लेखन गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारपेठ, सरकारी दवाखाने, बसस्थानक, पोस्ट ऑफिस, सार्वजनिक जागा अशा विविध दर्शनी भागांवर करावयाचे आहे. तालुकास्तरावर स्पर्धेचे संनियंत्रण व गावातील घोषवाक्यांची तपासणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी करणार आहेत. उत्कृष्ट घोषवाक्य लिहिणाऱ्या ग्रामपंचायतींचा २ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हास्तरावर गौरव करण्यात येईल. उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन जिल्ह्यांचा सन्मान राज्यस्तरावर होणार आहे.

Web Title: Slogan writing competition for sustainable cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.