रेती उत्खनन प्रकरणी दोन हॉयवासह सहा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:00 AM2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:39+5:30

विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी गुंतले असल्याचे बघून चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु होती. त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये बहुतांश कर्मचारी, अधिकारी सुटीवर गेले. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकुळ सुरू केला होता. याबाबत येथील तहसील कार्यालयामध्ये काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर तहसीलदारांनी या तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरु केले.

Six tractors seized in the sand excavation case | रेती उत्खनन प्रकरणी दोन हॉयवासह सहा ट्रॅक्टर जप्त

रेती उत्खनन प्रकरणी दोन हॉयवासह सहा ट्रॅक्टर जप्त

Next
ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : दमदाटी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी सुरु आहे. या प्रकरणी तहसीलदारांनी कठोर कारवाई करीत दोन हायवा ट्रकसह सहा ट्रॅक्टरवर कारवाई केली. आता या तस्करांवर नजर ठेवण्यासाठी एक पथक गठित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एका नायब तहसीलदारांना रेती तस्करांनी दमदाटी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी गुंतले असल्याचे बघून चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु होती. त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये बहुतांश कर्मचारी, अधिकारी सुटीवर गेले. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकुळ सुरू केला होता. याबाबत येथील तहसील कार्यालयामध्ये काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर तहसीलदारांनी या तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरु केले. याचाच एक भाग म्हणून घुग्घूस परिसरातून रेती तस्करी करताना दोन हॉयवा तसेच चंद्रपूर येथून सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यातील काही वाहनमालकांकडून दंड वसुल करण्यात आला तर काहींना नोटीस पाठविण्यात आला आहे. रेती तस्करी थांबण्यासाठी तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यासह सहा तलाठ्यांचे एक पथक गठित केले असून या पथकाच्या माध्यमातून रेती तस्करांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. सदर पथक येथील इरई नदी तसेच परिसरातील नदी, नाल्यांवर लक्ष ठेवून आहे.

तस्करांची माहिती द्या
चंद्रपूर शहरात रेती तस्करी होत असल्यास त्यासंदर्भात तहसील कार्यालयात माहिती द्या, अशआ रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे आवाहन येथील तहसीलदार निलेश गौंड यांनी केले आहे.

Web Title: Six tractors seized in the sand excavation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू