साहेब, मेडिकलमध्ये औषधे आणायला चाललोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:00 AM2021-04-14T05:00:00+5:302021-04-14T05:00:40+5:30

शनिवारी व रविवारी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक लॉकडाऊन पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. काही अत्यावश्यक सेवेची दुकाने, मेडिकल, हास्पिटल सुरू होती; तर चौका-चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत होते. मनपाचे पथकही विनामास्क घालून फिरणाऱ्यांकडून दंड ठोठावत होते. पोलिसांचे पथक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची, वाहनधारकांची कसून चौकशी करीत होते. ज्याच्याकडे ठोस कारण नाहीत, अशांवर दंड ठोठावत होते.

Sir, we are going to bring medicines in medical ... | साहेब, मेडिकलमध्ये औषधे आणायला चाललोय...

साहेब, मेडिकलमध्ये औषधे आणायला चाललोय...

Next
ठळक मुद्देवीकेंड लॉकडाऊन : दोन दिवसांत ४८ हजार ७०० रुपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘बेक्र द चेन’अंतर्गत शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, या काळात बाहेर पडणाऱ्या नागरिकांची शहरातील चौका-चौकात पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यावेळी बहुतांश जणांनी साहेब, मी रुग्णालयात जातो, तर काहींनी मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी जात असल्याची बतावणी केली. 
शनिवारी व रविवारी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक लॉकडाऊन पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. काही अत्यावश्यक सेवेची दुकाने, मेडिकल, हास्पिटल सुरू होती; तर चौका-चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत होते. मनपाचे पथकही विनामास्क घालून फिरणाऱ्यांकडून दंड ठोठावत होते. पोलिसांचे पथक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची, वाहनधारकांची कसून चौकशी करीत होते. ज्याच्याकडे ठोस कारण नाहीत, अशांवर दंड ठोठावत होते. दोन दिवसांत पोलिसांनी ४८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या प्रसादासोबतच दंडही भरावा लागला. 
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रशासन कसून प्रयत्न करीत आहे. मात्र काही बेफिकीर प्रवृत्तीच्या नागरिकांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शनिवारी झालेली कारवाई
चंद्रपूर शहरात चौका-चौकात पोलीस तपासणी करीत होते. यावेळी विनाकारण बाहेर पडणाऱ्या सुमारे ८२ जणांवर कारवाई करून २० हजार ८०० रुपयांदा दंड ठोठावण्यात आला. 

रविवारी झालेली कारवाई
वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे रविवारी पोलिसांनी तपास मोहीम कडक केली होती. रविवारी १३१ जणांवर कारवाई करून २७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. 

बाहेर येणाऱ्यांची कारणे सारखीच 
वीकेंड लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी पोलीस प्रशासनाकडून केल्यानंतर सर्वांची कारणे सारखीच आढळून आली. अनेकांनी रुग्णालयात डबा घेऊन चाललोय, औषधे आणायला मेडिकलमध्ये चाललोय, किराणा साहित्य आणण्यासाठी चाललोय, अशी कारणे पोलिसांना सांगितली

 

Web Title: Sir, we are going to bring medicines in medical ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.