शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीत जुने महसुली रेकॉर्ड जीर्ण

By admin | Updated: July 30, 2014 23:54 IST

सुमारे १०० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पुर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाभूत होण्याचा धोका वाढला आहे.

संगणीकृतची गरज : नागरिक मिळत नाही दाखलेसिंदेवाही : सुमारे १०० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पुर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाभूत होण्याचा धोका वाढला आहे. महसूलसोबत कोणत्याही कार्यालयात जुने रेकॉर्ड जपून ठेवले जाते. मात्र हे रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. कागदपत्राच्या गठ्यांमधून व्यवस्थित कागद काढणे कठीण झाले आहे. अनेकांना जुना रेकॉर्ड उपयोगी पडते. एखाद्या नागरिकाने रेकॉर्ड मागणीकरिता अर्ज सादर केल्यानंतर त्याला हे कागदपत्र देताना पाने फाटलेली आढळतात. अनेक शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्ड ठेवलेल्या खोलीमध्ये पावसाळ्यात पाणी गळते. त्यामुळे जुने रेकॉर्ड आता अत्यंत खराब झाले आहे. रेकॉर्ड जीर्ण असल्यामुळे संबंधित लिपीकाकडून नक्कल पुरविता येत नाही, अशी उत्तरे मिळतात.ग्रामस्थांना १० वर्षांपूर्वी ज्या रेकॉर्डची प्रत काढली, त्याची पुन्हा प्रत काढण्यासाठी मागणी केली असता ते रेकॉर्डच जागेवर आढळून येत नाही. परिणामी नेमके ते रेकॉर्ड गेले कुठे , त्या पानाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेकॉर्ड गहाळ होण्यास संबंधित लिपीकही जबाबदार नसतो. अनेक वर्षात अनेक लिपीकांच्या हातून रेकॉर्ड गेले असतात. पाने चाळताना ते कागदपत्र आणखी जीर्ण होतात. त्यामुळे कागदपत्राचा चुराडा होतो. मात्र रेकॉर्ड मिळत नसल्याने जनतेचे हाल होतात. जन्म नोंद, कोतवाल बुकाची नक्कल, हक्क नोंदणी हा जुना पुरावा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्राकरिता मागण्यात येतो. त्याच पुराव्याच्या आधारे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. वर्षानुवर्षे ही कागदपत्रे तहसीलमध्ये बांधून पडलेली असतात. (शहर प्रतिनिधी)