शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

शेतकऱ्यांनी आत्मसंरक्षणाकरिता बंदूक हाती घ्यावी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : जंगलानजीकच्या शेतातील पिके वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत आहे. वन्यप्राणी शेतकºयांवर हल्ले करून ठार करीत आहे. ...

ठळक मुद्देबाळू धानोरकरांचा अधिकाºयांना संतप्त सवाल : अर्र्जूनीत घेतली ग्रामस्थांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : जंगलानजीकच्या शेतातील पिके वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत आहे. वन्यप्राणी शेतकºयांवर हल्ले करून ठार करीत आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकºयांच्या कुटुंबीयांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. वन विभाग वन्य प्राण्यांचा योग्य बंदोबस्त करीत नसल्याने आत्मसंरक्षणाकरिता शेतकऱ्यांना आता हातात बंदूक घ्यावी काय? असा संतप्त सवाल आमदार बाळु धानोरकर यांनी मंगळवारी अर्जुनी गावात अधिकाºयांच्या बैठकीत केला.वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावात मागील दीड महिन्यात बिबट्याने हल्ला करून तीन व्यक्तींचा बळी घेतला. एका शाळकरी मुलाला गंभीर जखमी केले. या पार्श्वभूमीवर आमदार बाळू धानोरकर यांनी वन (बफर कोअर) महसुल, पंचायत, कृषी अधिकारी व ग्रामस्थांची अर्जूनीत बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपले गाव स्वच्छ ठेवावे, शौचलयास उघड्यावर जावू नये याकरिता आमदार धानोरकर यांनी ५० व वनविभागाने ५० शौचालय अर्जुनी गावात बांधणार असल्याची घोषणा केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्यांच्या वारसांना स्थायी नोकरी देण्याची मागणी आमदार धानोरकर यांनी केली. अर्जुनी गावाच्या परिसरातील भानुसखिंड येथील नाल्यावर बंधारा बांधून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे तसेच शेतात सौर उर्जेचे कुंपण व दिवे लावण्यात यावे, असे निर्देश आमदार धानोरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.पिके शेतातून आणण्याकरिता वनविभागाने शेतकºयांना कर्मचारी व वाहन, मजुरांना दरमहा धान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश महसुल विभागाला देत ग्रामस्थांनी अशा मजुरी करणाºया कुटुंबीयांची यादी सादर करावी, असे आवाहनही आमदार धानोरकर यांनी यावेळी केले.यावेळी अर्जुनी गावाच्या सरपंच यामिनी बोथले, पोलीस पाटील झिंगरे, वनाधिकारी गजेंद्र नरवने, एसीएफ दिव्या भारती, डिएफओ कोअर लडकते, आरएफओ आर. जी. मून, तहसीलदार सचिन गोसावी, पोलीस उपनिरीक्षक तिवारी, तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश, संवर्ग विकास अधिकारी संजय बोदेले, सहायक संवर्ग विकास अधिकारी बोबडे, बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे, नगरसेवक राजू महाजन, वाहतुक सेना जिल्हा प्रमुख प्रमोद मगरे, निलेश भालेराव, बाजार समिती संचालक बंडू शेळकी, योगेश खामनकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीwildlifeवन्यजीव