शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

सावलीचे ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधीक्षकांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:00 IST

सावली हे तालुक्याचे ठिकाण असून १११ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरिता मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, या रूग्णालयात नियमित वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रूग्णावर पाहिजे त्या प्रमाणात उपचार होत नाही. त्यामुळे रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर केले जाते. परिणामी रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

ठळक मुद्देआरोग्यसेवा प्रभावित : रूग्णांची गैरसोय, खासगी रुग्णालयात धाव

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुक्याच्या मुख्यालयात एक ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु, मागील चार वर्षांपासून ग्रामीण रूग्णालयाचा प्रभार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याने रूग्णसेवा प्रभावीत झाली आहे.सावली हे तालुक्याचे ठिकाण असून १११ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरिता मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, या रूग्णालयात नियमित वैद्यकीय अधीक्षक नसल्याने रूग्णावर पाहिजे त्या प्रमाणात उपचार होत नाही. त्यामुळे रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर केले जाते. परिणामी रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रूग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात औषधसाठा उपलब्ध नसल्याने रूग्णांना खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागते.शासनाकडून आरोग्यसेवा नियमित मिळण्याकरिता कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मात्र या रूग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्याने उद्दीष्टपूर्ती होत नाही.कायमस्वरुपी वैद्यकीय अधीक्षकांची मागणीसाधा आजार असणाºया रूग्झाांना सुद्धा या रूग्णालयातून रेफर केले जाते. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक रूग्णावर उपचार करण्याकरिता वेळेवर येत नसल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत रूग्ण दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या रूग्णालयात नियमित व अधिकृत वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.सावली येथे चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक अधिकाºयाकडे अधीक्षकांचा पदभार दिला आहे. वैद्यकीय अधीक्षक हे वर्ग एकचे पद आहे. ते शासनस्तरावरुन एमपीएससी किंवा बळतीने भरल्या जाते. रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत.निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूरआरोग्य सेवा सुस्थितीत राहण्यासाठी सावली येथील ग्रामीण रूग्णालयात तत्काळ नियमित व अधिकृत वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- अनिल स्वामीअध्यक्ष, शेतकरी सोसायटी सावली

टॅग्स :hospitalहॉस्पिटल