जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प तुडूंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:25 IST2018-08-21T00:23:59+5:302018-08-21T00:25:55+5:30
जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत.

जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प तुडूंब
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत. चंद्रपूर शहर आणि महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात ६० टक्के जलसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने नाल्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यात चार दिवस संततधार पाऊस पडला. त्यामुळे वर्धा, इरई, झरपट, पैनगंगा, अंधारी व उमा नदीला पूर आला आहे.
या पुरामुळे नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सोयाबीन कापूस व धानाला पुराचा फटका बसला आहे. पूराची माती शेतात आल्याने शेकडो शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन खरडली. पूराचे पाणी उतरल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येवू शकेल. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी कृषी व महसूल विभागाला माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.
पावसामुळे घोडाझरी प्रकल्पात ४५ .४८ टक्के ,नलेश्वर प्रकल्पा ४९.८५ टक्के, जलसाठा झाला. वर्धा नदी पूर आल्याने सकमुर, चेकबोपापूर, धाबा व गोजोली येथील प्रादेशिक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.