ट्रॅक्टर अपघातात सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:11 PM2019-04-26T22:11:41+5:302019-04-26T22:12:23+5:30

येथून जवळच असलेल्या बरडकिन्ही येथील नाल्याजवळ दोन टॅक्टरची एकमेकांना धडक बसली. यात सात जण जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

Seven injured in a tractor crash | ट्रॅक्टर अपघातात सात जखमी

ट्रॅक्टर अपघातात सात जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गांगलवाडी : येथून जवळच असलेल्या बरडकिन्ही येथील नाल्याजवळ दोन टॅक्टरची एकमेकांना धडक बसली. यात सात जण जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
जखमीमध्ये गीता संतोष मैन्द रा.रानबोथली, उषा दशरथ खरकटे (४०), आशिष दशरथ खरकटे(१३), सानिया गुरुदेव मेश्राम (१.५) , वैभव शंकर राऊत (१४), सरिता जनार्धन कांबडकर (३५) रा. मेंढा, व एक महिलेचा समावेश आहे.
यातील एक ट्रॅक्टर बरडकिन्ही मार्गे वरात घेऊन येत असताना त्याच मार्गे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने वरात असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यामुळे एक ट्रॅक्टर उलटला. या अपघातात सात जण जखमी झाले. जखमींना गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्राथमिक उपचार करून ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आल्याचे समजते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खेडीकर, मेजर रायपुरे, गौरकार करीत आहेत.

Web Title: Seven injured in a tractor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात