शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

१ जानेवारीपासून सेट टॉप बॉक्स अनिवार्य

By admin | Updated: December 20, 2015 00:51 IST

जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रात ग्राहकांना डिजीटल प्रक्षेपण पाहण्यासाठी ...

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : नागरी क्षेत्रातील गावांनाही निर्देश चंद्रपूर : जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रात ग्राहकांना डिजीटल प्रक्षेपण पाहण्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी सेटटॉप बॉक्स किंवा डी.टी.एच. जोडणी लावणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यावेळी उपस्थित होते.यावेळी म्हैसेकर म्हणाले, भारत सरकारच्या सूचना तथा प्रसारण मंत्रालयातर्फे ११ नोव्हेंबर २०११ द्वारे प्रत्येक केबल प्रचालकांना कोणत्याही टेलिव्हिजन चॅनल कार्यक्रमाचे प्रक्षेपण,प्रसारण हे डिजीटल संबोध्य प्रणालीचे माध्यमातून करणे अनिवार्य केलेले आहे. त्यानुसार टप्पा-३ मधील महानगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्र यांना ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ही कार्यवाही करणे अपेक्षित आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व केबल ग्राहकांना डिजीटल प्रक्षेपण पाहण्यासाठी डिजीटल सेटटॉप बॉक्स किंवा डी.टी.एच. जोडणी लावणे अनिवार्य असून जे ग्राहक सेटटॉप बाक्स किंवा डी.टी.एच. लावणार नाहीत, अशा केबल ग्राहकांना केबलद्वारे होणारे प्रक्षेपण दिसणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक प्रसिद्घी देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिलीे. चंद्रपूर जिल्ह्यात नागरी क्षेत्रात ६७ हजार १०७ जोडण्या असून नागरी क्षेत्रातील गावात १६ हजार ७५ इतक्या केबल जोडण्या आहेत. चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, भद्रावती, मूल, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, शिवाजीनगर (माजरी), कोंडूमाल, दुगार्पूर, उर्जानगर, ताडाली, पडोली, घुग्घुस, नकोडा, नांदगाव (पोडे), विसापूर, आवारपूर (कोरपना), नांदा (कोरपना), गडचांदूर, सास्ती व धोपटाळा यांचा यात समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)उपलब्ध असलेले सेटटॉप बॉक्सचंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत जि.टी.पी.एल. केबल नेटवर्क या कंपनीने सध्या सहा हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. यु.सी.एन. केबल नेटवर्क कंपनीने आठ हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. सी.टी.केबल नेटवर्क कंपनीने १० हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. वि.सी.सी.एन. केबल नेटवर्क कंपनीने एक हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. जैन हिट्रस केबल नेटवर्क कंपनीने एक हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. याशिवाय सेटटॉप बॉक्स तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व बहुविध यंत्रणा चालकांना जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी तक्रारसेटटॉप बॉक्सची किंमत १२०० ते १४०० रुपयापर्यंत आहे. आणि ही रक्कम केवळ एकाचवेळी भरायची आहे. या संदर्भात केबल आॅपरेटरबाबत काही तक्रार असल्यास ती तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवा, असेही यावेळी जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.