शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्र संपत आले, गुरुजीचा पत्ताच नाही !

By admin | Updated: January 31, 2015 23:18 IST

ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा कांगावा अधिकारी करीत असले तरी प्रत्यक्षात पहाडावरील शाळांची अवस्था वाईट आहे. देवलीगुडा, येल्लापूर(खु),

जिवती : ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा कांगावा अधिकारी करीत असले तरी प्रत्यक्षात पहाडावरील शाळांची अवस्था वाईट आहे. देवलीगुडा, येल्लापूर(खु), मरकलमेंढा, गुडसेला, रायपूर, कमलापूर, परमडोली, धर्मारम शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शाळेचे सत्र संपत आले. मात्र शाळेला अद्यापही ‘गुरुजी’ मिळाले नाहीत. त्यामुळे कुठे एका शिक्षकाला तर कुठे पाच वर्गाला दोन शिक्षकांना शिकविण्याची कसरत करावी लागत आहे.शिक्षण विभागाच्या अध्यादेशानुसार काही शाळांला पाच वर्गाची बढती मिळाली, तर काही शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र त्या ठिकाणी दुसरा शिक्षक देण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही. त्यामुळे आहे त्या शिक्षकांवरच अधिक ताण पडत आहे. शालेय सभा, डाक पोहचविणे इत्यादी शालेय कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शिक्षकावर शाळेचा भार असल्याने पहाडावरील शाळांतील शिक्षणाचा खेळखंडोबाच होत असल्याचा प्रकार प्रस्तुत प्रतिनिधीने शाळा भेटी दिल्यानंतर समोर आला आहे. देवलागुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते पाच वर्ग असून ७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी मात्र दोनच शिक्षक आहे. येल्लापूर (खु.) वर्ग चार, शिक्षक-एक, विद्यार्थी २५, मरकलमेंढा वर्ग आठ शिक्षक-चार, विद्यार्थी ११४, गुडसेला वर्ग चार शिक्षक एक, विद्यार्थी ६१; रायपूर वर्ग चार, शिक्षक एक, विद्यार्थी सात; परमडोली वर्ग आठ, शिक्षक चार, विद्यार्थी ४०; धर्मारम वर्ग चार, शिक्षक-एक, विद्यार्थी १६; कमलापूर वर्ग चार, शिक्षक एक, विद्यार्थी सात अशी या शाळांची पटसंख्या आहे. येथील मुख्याध्यापकांना शिक्षण विभागासोबत पत्रव्यवहार, बैठका व इतर शालेय कामासोबतच चारही वर्ग शिकविण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. एका वर्गाला शिकविताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मात्र स्वयंअध्ययन केल्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळे दिवसभरात या विद्यार्थ्यांच्या नशिबी एक किंवा दोन तास येतात. याबाबत संबंधीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेकवेळा शासन प्रशासनाकडे शिक्षकाची भरती करावी, अशी विनवणी केली व पाठपुरावाही करतात. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येत नाही. पालकांना आश्वासने मिळाली; पण सत्र संपत आले तरी गुरुजी मिळाले नाहीत. प्रशासनाला ग्रामीण भागातील शिक्षणाशी काही देणे-घेणे नाही, हे यावरुन स्पष्ट होते. एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन उपक्रम अंमलात आणले जातात. मात्र पहाडावरील शाळांची अवस्था अतिशय बिकट झाल्याचे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)