पीसीपीएनडीटी कायद्याची गांभीर्याने अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:10+5:302021-09-10T04:35:10+5:30
यावेळी डॉ. पल्लवी इंगळे, प्रा. डॉ. दीप्ती श्रीरामे, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. जी. आर. पाटील, ॲड. मंगला बोरीकर आदी उपस्थित ...

पीसीपीएनडीटी कायद्याची गांभीर्याने अंमलबजावणी करा
यावेळी डॉ. पल्लवी इंगळे, प्रा. डॉ. दीप्ती श्रीरामे, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. जी. आर. पाटील, ॲड. मंगला बोरीकर आदी उपस्थित होते. डॉ. राठोड म्हणाले की, पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करता कामा नये. जिल्ह्यात असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालय किंवा सोनोग्राफी केंद्रावर कायदेशीर कारवाई व गुन्हा नोंद करण्यात येईल. सोनोग्राफी केंद्रांनी नूतनीकरणाचे प्रस्ताव एक महिन्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. केंद्रामध्ये कोणतेही बदल करावयाचे असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घ्यावी. परवानगी न घेता सोनोग्राफी केंद्रामध्ये बदल केल्यास कारवाई केली जाईल, असेही डॉ. राठोड यांनी सांगितले.
बॉक्स
दर हजारी मुलींचे प्रमाण ८३५
जून महिन्यात जिल्ह्यात दर हजारी मुलींचे प्रमाण ८३५ तर मुलांचे प्रमाण ८३० होते. या महिन्यात स्त्री–पुरुष प्रमाण १००५ एवढे राहिले आहे. जुलै महिन्यात हे प्रमाण ९६७ होते. जुलै महिन्यात दरहजारी मुलींची संख्या ८४१ तर मुलांची संख्या ८७० असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.