शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिवती तालुक्यातील शाळा होणार गणित विषयात प्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

आजच्या युगात विद्यार्थ्यांपुढील आव्हाने वाढलेली आहेत. प्रतियोगिता परीक्षा हा आजच्या नव्या युगातील अत्यंत महत्त्वाचा व अनिवार्य भाग आहे. यासाठी गणित विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. गणितीय संकल्पनांमध्ये व जलद गणितीय क्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर असल्यास त्याला या अभ्यासाचा लाभ मिळतो. विद्यार्थ्यांचे गणित समृद्धीकरण करण्यासाठी पंचायत समिती जिवती अंतर्गत पाढे पाठांतर हा उपक्रम ३ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे‘मैत्री करू या पाढ्यांशी’ कार्यक्रमांतर्गत पाढे पाठांतर उपक्रम

संघरक्षीत तावाडेलोकमत न्यूज नेटवर्कजिवती :  गेल्या दहा महिन्यापासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याने यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाईन शिक्षण असले तरी जिवतीसारख्या अतिदुर्गम तालुक्यात नेटवर्क समस्या असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासाचा पुरेपूर फायदा झाला नाही. मात्र उरलेल्या दीड दोन महिन्यांत विद्यार्थ्यांना कमीतकमी गणित विषयाचा फायदा व्हावा, विद्यार्थ्यांना पाढे यावे यासाठी जिवतीचे गट विकास अधिकारी डॉ. ओम रामावत यांनी एक नवीन संकल्पना आणली आणि त्याची सुरुवातसुद्धा रविवारी बालिका दिन या दिवशी करण्यात आली आहे.आजच्या युगात विद्यार्थ्यांपुढील आव्हाने वाढलेली आहेत. प्रतियोगिता परीक्षा हा आजच्या नव्या युगातील अत्यंत महत्त्वाचा व अनिवार्य भाग आहे. यासाठी गणित विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. गणितीय संकल्पनांमध्ये व जलद गणितीय क्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर असल्यास त्याला या अभ्यासाचा लाभ मिळतो. विद्यार्थ्यांचे गणित समृद्धीकरण करण्यासाठी पंचायत समिती जिवती अंतर्गत पाढे पाठांतर हा उपक्रम ३ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात केवळ जिवती तालुक्यात राबविण्यात येत आहे.जिवती तालुक्यातील जि. प. शाळेंचे विद्यार्थी गणित विषयात तरबेज होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे  यांच्या मार्गदर्शनात डॉ. रामावत यांच्या संकल्पनेतून “मैत्री करू या पाढ्यांशी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी सचिनकुमार मालवी, चरणदास कोरडे, तारा घुगुल, सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधन व्यक्ती यांनी नियोजन केले आहे.

उत्कृष्ट शाळांचा      होणार सन्मानया अंतर्गत इयत्ता पहिली ते दुसरीचे विद्यार्थी १ ते १० पर्यंत पाढे,इयत्ता तिसरी ते चौथीचे विद्यार्थी १ ते २०पर्यंत पाढे आणि इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी १ ते ३० पर्यंत पाढे पाठ करणार आहेत. तालुक्यातील उत्कृष्ट तीन शाळांना तसेच प्रत्येक केंद्रातील तीन शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यावा आणि सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ रामावत यांनी केले आहे. 

कोरोनाच्या काळात विद्यार्थी घरी असले तरी उरलेल्या काही दिवसात त्यांचा गणित विषय भक्कम व्हावा आणि दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक असणारे पाढे विद्यार्थ्यांना यावे, यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. - डॉ ओम रामावत,गट विकास अधिकारी, जिवती

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण