शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या कवेलू मॉडेल इमारती आता दुर्मिळ

By admin | Updated: December 26, 2016 01:20 IST

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या शाळांच्या लाकडी फाटे व कवेलूंचे छप्पर यांनी बनलेल्या इमारती त्या काळी ‘शाळा इमारत मॉडेल’ असे मानल्या जात होत्या.

वसंत खेडेकर  बल्लारपूर चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या शाळांच्या लाकडी फाटे व कवेलूंचे छप्पर यांनी बनलेल्या इमारती त्या काळी ‘शाळा इमारत मॉडेल’ असे मानल्या जात होत्या. बहुतेक शाळा इमारतींची बांधणी सारखीच ! इंग्रजी यू किंवा चौकोनी हौदाच्या आकाराची ! काळ बदलला शाळांच्या इमारतींचे मॉडेल बदलून त्याची जागा आता स्लॅबच्या इमारतींनी घेतली आहे. मात्र, जुन्या लोकांच्या मनात ‘त्या ’ इमारती घर करुन बसल्या आहेत. तसल्या इमारती आजही कायम आहेत. मात्र, त्यांची संख्या दुर्मिळ ! अपवादात्मक संख्येत त्या दिसून येतात. या दुर्मिळ होत असलेल्या इमारतीची आपली खास ठेवण होती. गावाबाहेरची खुली आणि रस्त्याला लागून असलेली प्रशस्त जागा. त्या जागेवर ही इमारत उभी ! स्लॅबच्या आताच्या दोन मजली एवढी इमारतीची उंची. दर्शनी भागात पाच सहा खोल्या. त्यांच्या दोन्ही बाजूला एकमेकांसमोर पाच सहा खोल्या. मुख्य इमारतीला लागून छप्पर आणि समोर पटांगण ! प्रत्येक खोलीला दारासोबतच मागे पुढे अशा निदान चार खिडक्या, जेणेकरून खोल्यांमध्ये हवा खेळती राहील आणि मुख्याध्यापकाला आपल्या कक्षात बघून वर्ग खोलीत काय चालले आहे, हे बघता येईल ! मैदानात मधोमध ध्वजारोहणाचा चबुतरा आणि शाळेभोवती संरक्षक भिंत असेल तर दर्शनी भागात प्रवेशद्वार, त्यावर कमान आणि त्या कमानीवर विद्यालयाचे नाव ! शाळा शासकीय वा खासगी प्राथमिक असो वा माध्यमिक कोणत्याही शाळेच्या इमारतीचा सारखा साचा ठरलेलाच, तशा इमारती आता नावापुरत्याच उरल्या आहेत. आता, बहुतके शाळा आपापल्या पद्धतीने शाळा इमारती बांधत असल्याचे दिसून येते. जुन्या पद्धतीच्या शाळा इमारती आता फारशा नजरेत पडत नाही. चंद्रपूर- नागपूर मार्गावर नंदोरी या गावात गावाच्या काही अंतरावर मुख्य मार्गाच्या जवळ त्या प्रकारची जुनी कवेलूची इमारत तेवढी बघायला मिळते. ती इमारत बघून जुन्या लोकांना आठवण येते त्यांनी शिक्षण घेतलेल्या आपल्या शाळा इमारतीची, आपल्या गावाची.