शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

जनप्रबोधनासाठी रंगणार शाळेच्या भिंती

By admin | Updated: January 28, 2015 23:12 IST

जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांमुळे अनेकवेळा मानवांना आपला जीव गमवावा लागतो.अशा घटनांवर आळा बसावा, नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांबाबत

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरजिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांमुळे अनेकवेळा मानवांना आपला जीव गमवावा लागतो.अशा घटनांवर आळा बसावा, नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांबाबत आपुलकी निर्माण व्हावी सोबतच जंगलात जाण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. आता गावागावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या भिंतीवर तैलचित्राद्वारे माहिती देण्यात येणार आहे.औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण मोठे आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासात नागरिकांनी आपले बस्तान सुरु केले आहे. जिल्ह्यातील अनेक गावे जंगलाशेजारी असल्याने प्रत्येकवेळी मानवांना जंगलात जावे लागते. मोहफुल वेचनी, इंधनासाठी लाकूड, जनावरांना चरण्यासाठी जंगलात न्यावे लागते. अशावेळी वन्यप्राणी हल्ला करतात. त्यामुळे अनेकवेळा जखमी व्हावे लागते. कधीकाळी जीवही गमवावा लागतो. अशावेळी नागरिकांनी आपली सुरक्षा कशी करावी, जंगलात जाण्यापूर्वी काय करावे, कोणत्या परिसरात जावे, जंगलात जाण्यापूर्वी परवानगी कशी घ्यावी, शिकारींच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सामान्य नागरिक म्हणून आपले असलेले कर्तव्य सोबतच जंगली प्राण्यांना वाचविण्यासाठी काय केले पाहिजे यावर तैलचित्राद्वारे माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती गावागावांतील जिल्हा परिषद शाळांच्या भिंतीवर रंगविण्यात येणार आहे. चंद्रपूर वनविभागांतर्गत चार विभाग पाडण्यात आले आहे. यातील ब्रह्मपुरी, मध्यचांदा, चंद्रपूर वनविभाग तसेच ताडोबा असे आहे. ताडोबाअंतर्गत कोअर आणि बफर झोन क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये अनेकवेळा वन्यप्राण्यांनी हल्ले केले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांच्या भिंतीवर तैलचित्राद्वारे वनविभाग ग्रामस्थांना माहिती देणार आहे. यासाठी येथील मध्यचांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे.