शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एस.सी. प्रवर्गाचा टक्का घसरला

By admin | Updated: February 1, 2015 22:53 IST

आॅगस्ट २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या आरक्षणात २०१० च्या तुलनेत अनुसुचित जाती या प्रवर्गातील

नागभीड : आॅगस्ट २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या आरक्षणात २०१० च्या तुलनेत अनुसुचित जाती या प्रवर्गातील प्रभाग सदस्यांचा टक्का घसरला आहे.नागभीड तालुक्यात एकूण ६५ ग्रामपंचायती आहेत. यातील ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रीक निवडणूक येत्या आॅगस्ट महिन्यात होऊ घातली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येथील तहसीलदारांनी या ५० ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण नुकतेच जाहीर केले. यानुसार या ५० ग्रामपंचायतीमधून केवळ अनुसुचित जाती प्रवर्गातील केवळ ५१ सदस्य निवडल्या जाणार आहेत.नागभीड ग्रा.पं. मध्ये २०१० च्या निवडणुकीपर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गातील दोन सदस्य सातत्याने निवडले जायचे. पण नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणात केवळ एकच आरक्षण निघाले आहे. २००२ च्या निवडणुकीपर्यंत मिंथूर येथे या प्रवर्गात एका सदस्याला संधी मिळायची. पण २००७ पासून ही संधी बाद झाली आहे. अशीच परिस्थिती काही गावात उद्भवली असावी आणि त्यातूनच या आरक्षित जागेचा टक्का घसरला असावा असे समजल्या जात आहे. या उलट अनुसुचित जमाती प्रवर्गातील सदस्य संख्या २०१० च्या तुलनेत २०१५ मध्ये वाढली असल्याचे दिसून आले आहे. २०१० मध्ये अनुसुचित जमाती प्रवर्गातील प्रभाग सदस्यांची संख्या ८३ होती. तर आता २०१५ साठी जे आरक्षण निघाले त्यात ही संख्या ८७ वर पोहचली आहे. याबाबत तहसीलदार श्रीराम मुंदडा यांनी लोकसंख्येच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आरक्षण पडत असल्याचे म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)