शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडा गावात तापाची साथ

By admin | Updated: June 3, 2014 23:59 IST

सावली तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सायखेडा गावात मागील १५ दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. संपूर्ण गावच तापाने फणफणत असून अद्यापही आरोग्य यंत्रणा या गावात पोहचली नाही.

चंद्रपूर : सावली तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सायखेडा गावात मागील १५ दिवसांपासून तापाची साथ  पसरली आहे. संपूर्ण गावच तापाने फणफणत असून अद्यापही आरोग्य यंत्रणा या गावात पोहचली नाही. त्यात वैद्यकीय अधिकार्‍यांचा संप सुरू असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावात आरोग्य शिबिर सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोढे यांनी एका निवेदनातून केली आहे. घरातील एका व्यक्तीला ताप आल्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांना तापाची लागण होते. तीन ते चार दिवस अंगात ताप राहिल्यानंतर रुग्णाला प्रचंड अशक्तपणा येतो. त्यानंतर त्याला उलट्या होणे सुरू होते. असा प्रकार गेल्या १५ दिवसांपासून या गावात सुरू आहे. असे असले तरी अद्यापही आरोग्य यंत्रणेने या गावात आपली चमू पाठविली नाही. गावात कमालिची अस्वच्छता असून याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावातील सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्या अद्यापही तुंबून आहेत. गावात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. यातूनच असे आजार बळावत असल्याचा आरोप लोडे यांनी निवेदनातून केला आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत:च ठेकेदारी सुरू केल्याने गावातील विकासाकडे व नागरिकांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी गावकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे लोडे यांनी निवेदनात म्हटले आहे. १५ दिवसांपूर्वी याच गावातील एका बालकाला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. (प्रतिनिधी)