शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
6
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
7
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
8
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
9
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
10
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
11
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
12
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
13
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
14
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
15
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
16
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
17
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
18
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
19
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
20
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट

By admin | Updated: May 12, 2017 02:10 IST

चार लाख लोकसंख्येच्या आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या चंद्रपूर शहरातील बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत.

नागरिक हैराण : ग्रामीण भागात बिकट परिस्थिती चंद्रपूर : चार लाख लोकसंख्येच्या आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या चंद्रपूर शहरातील बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. त्रासलेले नागरिक बुधवारी बुद्धजयंतीची सुटी असल्याने कोणाकडे तक्रारही नोंदवू शकत नव्हते. चंद्रपूर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील बँकांमध्ये आणखीही बिकट परिस्तिथी आहे. चंद्रपुरात स्टेट बँक आॅफ इंडियाचे पाच एटीएम आहेत. बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आदीचेही एटीएम कार्यरत आहेत. तसेच जवळच्या पडोली येथेही एक एटीएम आहे. परंतु बुधवार या सुटीच्या दिवशी शहरात वेगवेगळ्या एटीएमवर फिरूनही रोख रक्कम मिळाली नाही. नागरिकांना एसबीआयच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्येच तेवढी रक्कम मिळाली. या एटीएमवर रक्कम मिळत असल्याने तेथे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती. उशिरा रात्रीपर्यंत तेथे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. नोटबंदी लागू झाल्यापासून चंद्रपूर शहरात रोख रकमेचा तुटवडा सुरू झाला आहे. मधल्या दोन महिन्यात व्यवहार सुरळीत झाले, असे वाटत असताना पुन्हा गेल्या आठवड््यापासून एटीएम केंद्र ‘आऊट आॅफ कॅश’ दाखविले जात आहेत. बँक आॅफ इंडियाचे एटीएम कायम ‘आऊट आॅफ कॅश’ अशी पाटी काचेच्या प्रवेशद्वारावर मिरवित असते. त्याबाबत बँकेचे अधिकारीही व्यवस्थित उत्तर देत नाहीत. त्याचा नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. पाटण येथे बँकेत मनमानी पाटण : जिवती तालुक्यात एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा पाटण येथे आहे पूर्ण तालुक्याचा व्यवहार याच बँकेतून चालतो. तीन ते चार दिवस बँक बंद होती. बँकेचे व्यवहार बंद होते. बँक व्यवस्थापकांनी एटीएमची किल्ली सोबत नेल्याने व ते बँकेत न आल्याने ग्राहकांची तारांबड उडाली. त्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. कुणाला दवाखाना तर कुणाला लग्नासाठी पैसे काढायचे होते. रकमेअभावी बँका कोरडया जिवती : जिवती ठिकाण हे तालुक्याचे असून येथे एकही राष्ट्रीयकृत बँका नाहीत. कोकण-वैनगंगा ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोनच बँका असून याही बँकात पैसे राहत नसल्याने तालुक्यातील जनतेला हैराण व्हावे लागत आहे. रक्कमेअभावी येथील बँकाच कोरड्या आहेत म्हणण्याची पाळी आली आहे. अनेक वर्षापासून जिवती येथे स्टेट बँकेची मागणी रेटून असली तरी या मागणीकडे संबंधीत विभाग व लोकप्रतिनिधीचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. खेड्यापाड्यातील नागरिकांना नेहमीच हात हलवित परत जावे लागते. सर्व तालुक्याचे व्यवहार या बँकेत जास्तच असून रक्कम मात्र पुरेशी राहात नाही. एखाद्या ग्राहकाने बँकेतील कर्मचाऱ्यांना पैशा बाबतीत विचारणा केली तर अर्वाच्च भाषेत उत्तर दिले जाते. अनेकदा तर बँकेत पैसे असले तर सामान्य नागरिकांना बँकेत पैसे नसल्याचे सांगत तेच पैसे सावकार लोकांना चुपचाप देत असल्याचेही बोंब आहे.