शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

लॉकडाऊन काळात दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे मोठे नुकसान : चंद्रपुरात एक हजार कोटींच्या उलाढालीला फटका

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूवगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होत्या. ३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली नाही. हा काळ लग्नसराईचा होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना जबर फटका बसला. चंद्रपूर शहरात एक हजार कोटी व ग्रामीण भागात एक हजार कोटींची उलाढाल या काळात ठप्प झाली. परिणामी किरकोळ व्यावसायिकांसोबतच मोठ्या व्यापाºयांचेही आर्थिक समीकरण बिघडले आहे.देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती.चंद्रपूर शहरात कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक यासारखी अनेक दुकाने आहेत. यात दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. लॉकडाऊनच्या काळात सर्व बाजारपेठच लॉकडाऊन असल्यामुळे लग्नसराई असतानाही एक छदामही खरेदी-विक्री झाली नाही. गतवर्षीची आकडेवारी लक्षात घेतली तर तब्बल एक हजार कोटींची उलाढाल ठप्प होती.२४० कोटींचा महसूल बुडालाचंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील व्यापारपेठा बंद असल्याने दोन्ही मिळून तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होती. यातून सरकारलाही मिळणाºया २४० कोटींच्या महसूलावर पाणी फेरले गेले.सराफा व्यवसायावर अवकळाउन्हाळा म्हटला की लग्नसराईचा काळ. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे लग्न व इतर कार्यक्रमावर बंदी होती. काही लग्नं उरकली. मात्र ती अत्यंत साधेपणाने. लग्नसराईत सोना-चांदी व्यवसायाची चांदी असते. मात्र यावेळी २३ मार्च ते ३ मे या कालावधीत सोना-चांदी व्यवसायातील ५० कोटींची उलाढाल ठप्प पडली.ग्रामीण भागातही हीच स्थितीचंद्रपूर शहरवगळता जिल्ह्यातील सर्व बाजारपेठाही लॉकडाऊन काळात बंद होत्या. कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक व इतर दुकानातील दरवर्षीची उलाढाल बघता यंदा २३ मार्च ते ३ मे या कालावधीत एक हजार कोटींची उलाढाल होऊ शकली नाही.उन्हाळ्याचा कालावधी लग्न व इतर कार्यक्रमांचा असतो. या काळात व्यापारपेठेत चांगली उलाढाल असते. यंदा लॉकडाऊनमुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील व्यापाºयांचा विचार केला तर किमान दोन हजार कोटींची उलाढाल होऊ शकली नाही. त्याचा किरकोर व मोठ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.- हर्षवर्धन सिंघवी,अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, चंद्रपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या