शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांना कोर्ट नव्हे, समाजमनच वाचवू शकते

By admin | Updated: February 1, 2016 00:52 IST

नद्यांनी माणसांचे जीवन समृद्ध केले. मात्र अलीकडे त्या प्रदूषित झाल्या आहेत. मानवी हस्तक्षेप त्यावर वाढल्याने या जीवनवाहिन्या कोजमेल्या आहेत.

जल परिषदेला प्रारंभ : राजेंद्र सिंग यांचे जनतेला आवाहनचंद्रपूर : नद्यांनी माणसांचे जीवन समृद्ध केले. मात्र अलीकडे त्या प्रदूषित झाल्या आहेत. मानवी हस्तक्षेप त्यावर वाढल्याने या जीवनवाहिन्या कोजमेल्या आहेत. त्यांना न्यायालय नव्हे तर, सरकार आणि समाजमनच वाचवू शकते, त्यासाठी त्यांनी पुढे यावे, असे आवाहन रेमन मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंग यांनी केले. चंद्रपुरात रविवारपासून दोन दिवसीय जलपरिषद आणि कृषी प्रदर्शनीला स्थानिक क्लब ग्राऊंडवर प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अध्यक्षस्थानी केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर होते. आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार नाना श्यामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, अ‍ॅड. रविंद्र भागवत, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्याकारी अधिकारी कल्याणकर, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आपल्या भाषणात डॉ. राजेंद्रसिंग म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही योजना भ्रष्टाचाराकडून सदाचाराकडे नेणारी योजना आहे. यासारख्या योजना प्रभावीपणे राबविल्यास दुष्काळावर मात करुन शेतीला सिंचनासाठी मदत होणार आहे. चंद्रपूरचे प्रदुषणाचे वातावरण बदलविण्यासाठी जंगल, जमीन आणि पाणी याकडे विशेष लक्ष दयावे लागणार आहे. जंगलातून वाहणा-या नदयांचा प्रवाह मंद करुन तो अडवूण भूगर्भात साठविला पाहिजे. त्यामुळे भूगभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.महाराष्ट्र शासनाने लोकसहभागातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार काढून राजेंद्रसिंह म्हणाले, भविष्यातील पाणी टंचाई व सिंचन वाढीवर नियोजनात्मक केलेले प्रयत्न म्हणजेच जलयुक्त शिवार योजना आहे. इरई नदीचे योग्य नियोजन केल्यास चंद्रपरातील पुराची स्थिती आणि पाण्याची टंचाई या समस्या आपोआप दूर होती, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोपटराव पवार म्हणाले, शेती, पाणी आणि जोडधंदे एकत्र आल्यास शेतीचे चित्र बदललेले असेल. विदर्भात पाणी असतांना सुध्दा शेतकरी आत्महत्या करीत आहे, हे थांबले पाहिजे. शेतकरी खरीपाकडून रब्बीकडे जात आहे. रब्बीसाठी संरक्षीत पाणी देणे गरजेचे आहे. यंत्रणांच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे असल्याचे सांगून पवार म्हणाले, गावातून काम करणारी यंत्रणा बाजूला झाली की कामाची गती मंदावते. जलसंधारणाच्या कामात महाराष्ट्राने देशापुढे आदर्श निर्माण केला आहे. जलयुक्त मधून केवळ बंधारेच नाही तर इतर जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करावी. आता १४ व्या आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार असल्यामुळे पाच वर्षांचा आराखडा गावाने तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. रविंद्र भागवत यांनी स्वयंपूर्ण शेतकरी निर्माण करण्यासाठी योग्य तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता त्यांनी विशद केली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. कार्यक्रमाला अनेक गावातील सरपंच, शेतकरी, बचतगटांच्या महिला व नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)