शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जादुटोण्याच्या संशयावरुन हत्येचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 22:47 IST

विज्ञानाचे युगात वावरतांना मोबाईल, फोनसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गावखेड्यातील लोकही वापर करतात. मात्र, सोळाव्या शतकातील भूत, करणी, जादुटोणा यासारख्या अस्तित्वहिन

सिंदेवाही : विज्ञानाचे युगात वावरतांना मोबाईल, फोनसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गावखेड्यातील लोकही वापर करतात. मात्र, सोळाव्या शतकातील भूत, करणी, जादुटोणा यासारख्या अस्तित्वहिन गोष्टींवर विश्वास ठेवतात. चंद्रपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेपोटी हत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.जुलै महिन्यात बल्लारपूरजवळ जादुटोण्याच्या संशयातून शंकर हरी पिंपळकर या इसमाचा अंधश्रद्धा जमावाने हत्या केली. १६ आॅक्टोबरला कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे भूत उतरविण्याच्या नावाखाली काकानेच पुतण्याचा बळी घेतला आणि आता सिंदेवाही तालुक्यातील सावरगाटा येथे जादुटोणा केल्याच्या संशयापायी दिवाळीच्या दिवशी राजेंद्र ठाकरे नावाच्या युवकाचा खून करण्यात आला.यासंदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी म्हटले आहे, ‘जादुटोण्याने माणसं मारता आली असती तर शासनाने सैन्यात मांत्रीकाची भरती केली नसती का? एवढा साधा तर्क गेली अनेक वर्षापासून आम्ही लोकांना समजावून सांगत आहोत. एवढचं नाही तर मंत्राने भाजला पापड जरी मोडून दाखविला तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती २१ लाख रुपयाचे बक्षीस देते. पण या प्रबोधनापेक्षा त्यांच्यावर अंधश्रद्धांचा पगडा कायम रहावा यासाठी सतत सुरू असलेल्या कार्यक्रमांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे आजही अंधश्रद्धेपोटी होणाऱ्या खुनांचे प्रमाण वाढत आहे. ज्या परिसरात या घटना घडतात तेथील स्थानिक सुशिक्षित अजूनही अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायला उत्सुक नाहीत ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने २६ आॅगस्ट २०१३ पासून ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम’ लागू केला आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यास कमीत कमी सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंड ते सात वर्षे कारावास आणि ५० हजार रुपयापर्यंत दंड असे शिक्षेचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या व्यक्तींवर जादुटोण्याचा संशय घेतला जातो अशा व्यक्तींनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी किंवा अंनिसच्या कोणत्याही शाखेला लेखी कळवावे, असे आवाहन विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)