अवैध रेती लिलावातून ६० लाखांचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:13+5:302021-09-10T04:35:13+5:30

वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना अवैध रेतीसाठ्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्यासमवेत भद्रावती तालुक्यातील ...

Revenue of Rs 60 lakh from illegal sand auction | अवैध रेती लिलावातून ६० लाखांचा महसूल

अवैध रेती लिलावातून ६० लाखांचा महसूल

वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना अवैध रेतीसाठ्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्यासमवेत भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील रेती घाटावर छापा मारून ३०५९ ब्रास अवैध रेतीसाठा, एक जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. रेतीसाठा उमेश बोडेकर व दिनेश बोडेकर यांच्या मालकीच्या शेतात आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ८ सप्टेंबर २०२१ रोजी जप्त करण्यात आलेल्या अवैध रेती साठ्याचा लिलाव वरोरा, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या दालनात करण्यात आला. लिलाव प्रक्रियेत सहा लोकांनी सहभाग घेतला. लिलावाची अपसेट प्राइस ३२ लाख ७६ हजार १८९ रुपये ठेवण्यात आली होती. त्यापैकी भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील सचिन ढोरे यांनी रुपये ६० लाखांची सर्वोच्च बोली लावल्याने हा रेतीसाठा त्यांना देण्यात आला. लिलावातून ६० लाखांचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे. लिलावाची प्रक्रिया भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी पूर्ण केली.

Web Title: Revenue of Rs 60 lakh from illegal sand auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.