शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

लावारी तलावात विदेशी पक्ष्यांचा मुक्काम

By admin | Updated: February 28, 2015 01:23 IST

नोव्हेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या हिवाळ्याचा कालावधीत तळोधी (बा.) परिसरातील पक्षी मित्रांना नवनवीन पक्ष्यांचे दर्शन होत आहे.

तळोधी (बा.): नोव्हेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या हिवाळ्याचा कालावधीत तळोधी (बा.) परिसरातील पक्षी मित्रांना नवनवीन पक्ष्यांचे दर्शन होत आहे. यावर्षीच्या हिवाळ्यात तळोधी (बा.) परिसरातील तलावांमध्ये अनेक देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याची नोंद घेण्यात आली. तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील विविध प्रकारच्या पक्षांचे आगमन व येथील नैसर्गिक वनसंपदा भविष्यात पक्षीमित्रांसाठी पक्षी निरीक्षण करण्याचा प्रमुख क्षेत्र बनले तर नवल वाटायला नको. यंदाच्या सत्रात तळोधी वनपरिक्षेत्रात ब्लॅक स्टोक, ब्लॅक आयबीस, व्हाईट आयबीस, रिव्हर टॅन, कामन, पोचार्ड, हार्न बोल ब्लॅक, यासारख्या अनेक पक्षांच्या ७० हून अधिक जातीची नोंद वनविभागाकडे करण्यात आली आहे. तळोधी (बा.) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील अध्यापनाचे कार्य सांभाळीत पक्षी निरीक्षण हा छंद करणारे पक्षी अभ्यासक व्ही. के. पवार यांनी लावारी तलावात शेकडो ग्रेलेग्जूज पक्ष्यांचे वास्तव्य आढळून आल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रेलेग्जगूज हे पक्षी हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून बचाव करण्यासाठी, आपले भक्ष्य शोधण्यासाठी किंवा प्रजनन करण्यासाठी उत्तरेकडील थंड प्रदेशातून दक्षिणेकडील भागात नियमित स्थलांतर करतात. आपली प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी या पक्षांना विशिष्ट परिस्थितीवर मात करुन हजारो किमीचे अंतर पार करणे गरजेचे असते. हे ग्रॅलेग्ज गूज जातीचे बदक यांना ग्रामीण भाषेत मोठी बाड्डी असेही म्हणतात.८० सेमी उंच असलेला हा पक्षी अंगाने जाडजूड असतो. त्याचे पाय व चोंच गुलाबी रंगाचे तर पंख कथ्या व पांढऱ्या रंगाचे असून वजन तीन ते चार किलो पर्यंत असते. तरीदेखील हा पक्षी वेगाने भरारी घेऊन उडण्याचे कौशल्य त्यांच्यात असते.युरोप, उत्तर अमेरिका, इंग्लंड, चीन व आशियातील अनेक देशात आढळणारा हा पक्षी उत्तर भारतात नियमित वास्तव्यास असून हिवाळ्यात दक्षिण भारतात स्थलांतर करीत असतो. हे पक्षी तळोधी वनपरिक्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे. रात्री धान्य, किडे इतर मेजवानी केल्यानंतर दिवसा तळाच्या काठावर किंवा पाण्यात विश्रांती करतात. मनुष्यवस्तीपासून दूर एकांतात राहणे त्यांना आवडते. हा पक्षी स्वभावाने भित्रा असल्याने कोणतीही चाहूल लागताच या पक्षांचे थवे आकाशात वेगाने भरारी घेतात. आकाशात काही काळ घिरट्या घातल्यानंतर पूर्ण आश्वस्त झाल्याचा अंदाज घेवून पाण्यात उतरतात. किंवा इतरत्र दूरवर निघून जातात. हे पक्षी जमिनीवर डौलदार पणे वावरत असताना शिकाऱ्यांच्या नजरेतून सुटू शकत नाही. त्यामुळे त्याची शिकार करणे सोपे जाते. त्यामुळे पक्षीमित्र, गावकरी व वनविभाग कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने या पाहुण्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे पक्षी मित्रांचे व पक्षी निरीक्षकांची मागणी आहे. (वार्ताहर) लावारी येथील तलावात नर्सरी असून तिथे दिवसभर नर्सरी विभागाचे कर्मचारी हजर राहत असतात. त्यामुळे येथे पक्ष्यांची शिकार होणे शक्य नाही. पक्ष्यांच्या संरक्षणासाठी विशेष व्यवस्था नाही. परंतु पानवड्यांवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून असतात.तळोधी (बा.) परिसरात अनेक विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य दिसून येते.चारगाव (माना) येथील तलावात होलीनेक स्टार्क हे पक्षी वास्तव्याला असून त्यांनी या परिसरात आपला निवारा शोधला आहे, अशीही माहिती पक्षी निरीक्षक व्ही. के. पवार यांनी दिली आहे.