शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीवर शिवणी येथे बंधाऱ्यासाठी निवेदन

By admin | Updated: January 6, 2017 01:18 IST

वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचन व्हावे तथा परिसरातील गावाचाा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा,

उमाकांत धांडे यांची मागणी : पेल्लोरा-निर्ली रस्त्याचीही मागणी राजुरा : वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचन व्हावे तथा परिसरातील गावाचाा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, या हेतुने चंद्रपूर शहरापासून केवळ आठ कि.मी. अंतरावरील तालुक्यातील शिवणी (चोर) येथे वर्धा नदीवर बंधारा बांधण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे यांच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिवणी, धिडशी, निर्ली, चार्ली, पेल्लोरा, किनबोडी, कढोली (बु.) येथील शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन आणि ग्रामपंचायतीचे ठराव ना. अहीर यांना देण्यात आले. यासोबतच पेल्लोरा आणि निर्ली ही दोन गावे अद्याप रस्त्याने जोडली गेली नसल्याने हा रस्ता आणि साखरी- निर्ली रोडवरुन शंकरदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे मागणीचे निवेदनही यावेळी देण्यात आले. वर्धा नदीपट्टयातील जमीन सुपीक असून शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेती समृद्ध होणार आहे. या परिसरात वेकोलिच्या खाणींमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी आधीच खोलवर गेली आहे. शिवणी येथे वर्धा नदीवर बंधारा झाल्यास पाण्याची पातळी वाढण्यासोबतच नदीपलिकडील राजुरा व कोरपना तालुक्यातील गावांसोबरोबरच चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील गावांना सिंचनाचा लाभ होईल तथा पिण्याचे पाण्याचीही सोय होईल, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत शिवणी, धिडशी, पेल्लोरा, साखरी आणि चार्ली ग्राम पंचायतीने बंधारा मंजूर करण्याबाबत ठराव देखील संमत केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन उमाकांत धांडे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे, गुरुदेव सेवा मंडळाचे पुंडलिक काकडे, अमरनाथ पाटील जीवतोडे, चार्लीच्या सरपंच पोर्णिमा दुबे, उपसरपंच किशोर ढुमणे, कवडू पाटील कौरासे, सुरेश कौरासे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)