८ मार्चपासून आयुक्तालयावर करणार ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: February 28, 2016 01:11 IST2016-02-28T01:11:22+5:302016-02-28T01:11:22+5:30
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष कायम असल्यामुळे ...

८ मार्चपासून आयुक्तालयावर करणार ठिय्या आंदोलन
शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष : १२ वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार
नांदाफाटा : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष कायम असल्यामुळे बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासण्यावर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे बहिष्कार टाकण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनावर समितीतर्फे काढण्यात आलेला मोर्चा व उपोषण आंदोलनामध्ये सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दीड महिन्यात विषय निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या संंबंधातील अहवाल पुणे आयुक्तालयात प्रलंबित आहे. आतापर्यंत सात वेळा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने प्राध्यापकांनी बारावी परीक्षांचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. पात्र शाळांची यादी शासनाने जाहीर करून यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुद करून जून २०१६ पासून कर्मचाऱ्यांच्या पगाराची तरतूद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)