शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’चे आश्वासन हवेत विरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

चुकीच्या नियोजनाने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. महसूल वाढावा म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख असलेले गडकिल्ले लग्नादी कार्याकरिता किरायाने देण्याचा शासनाने घाट रचना आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यायाने राज्याच्या वैभवशाली इतिहासचा अपमान असून भाजप सरकारने दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन हवेत विरले, ....

ठळक मुद्देअमोल कोल्हे : बल्लारपुरात शिवराज्य यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या व बेरोजगारीत वाढ होत असून दबावतंत्राने हुकूमशाही सुरू झाली आहे. चुकीच्या नियोजनाने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. महसूल वाढावा म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख असलेले गडकिल्ले लग्नादी कार्याकरिता किरायाने देण्याचा शासनाने घाट रचना आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यायाने राज्याच्या वैभवशाली इतिहासचा अपमान असून भाजप सरकारने दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन हवेत विरले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे सोमवारी सायंकाळी बल्लारपुरात आगमन झाल्यानंतर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर मंचावर राजेंद्र वैद्य, राकाँच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकनकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, माजी मंत्री अनिल देशमुख, बाबासाहेब वासाडे, दीपक जयस्वाल, विधान सभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेंभूर्डे, सूरज चव्हाण, मेहबूब शेख, डी. के आरीकर, सुरेश रामगुंडे, हिराचंद बोरकुटे, कुतुबुद्दीन सिद्दी आदींची उपस्थित होती. खासदार कोल्हे यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केला. शिवसेना व भाजपच्या महाजनादेश यात्रेपेक्षा शिवस्वराज्य यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, काही नेते राकाँ सोडून गेल्याने काही फरक पडणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातून राकाँ दोन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र वैद्य यांनी केले. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आजी - माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस