शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय कृषी संचालकापुढे शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या

By admin | Updated: November 9, 2014 22:30 IST

पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान

देवाडा खुर्द : पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान पीक सुकत आहेत. धान पिकाचे तणस झाले असून जगायचे तर कसे असा प्रश्न निराश झालेल्या शेतकऱ्यांनी नागपूरचे विभागीय कृषी सह संचालक यांना केला. विभागीय कृषी सह संचालक नागपूर यांनी आपल्या पथकासह शुक्रवारी पोंभूर्णा तालुक्याला भेट देऊन धानपिक परिसराची पाहणी केली. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी विभागीय कृषी सह संचालक डॉ. विजय धावटे, विभागीय कृषी अधिकारी सलोदे, जिल्हा कृषी अधीक्षक हसना चहांदे, उपविभागीय कृषी अधिकारी बानोडे यांची उपस्थिती होती. कृषी अधिकाऱ्यांचे पथक ७ नोव्हेंबरला पोंभूर्णा तालुक्यामध्ये दाखल झाले. सर्व प्रथम या पथकाने मुल-पोंभूर्णा मार्गावरील जामतुकूम परिसरातील शेतशिवाराला भेट देऊन ेपावसाअभावी सुकलेल्या धानपिकांची पाहणी केली. यावेळी डॉ. विजय धावटे यांनी शेतावर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. परिसर पाहणी केल्यानंतर या परिसरात धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. झालेल्या नुकसान संदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या अनेक व्यथा मांडल्या आणि या परिसरामध्ये सिंचनाची सोय नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत मामा तलाव, शेतबोडी, विहीर नाले यांचेवर अवलंबून शेतीचे उत्पादन घ्यावे लागत आहे. त्यामुळे अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे परिसरामध्ये सतत नापिकी येत असल्याचे सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भाष्कर गायकवाड, पं.स. सदस्या रिनाताई बोधळकर, मंडळ अधिकारी काळे, कृषी सहाय्यक ताळे, पेंदोर व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)