शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

वनविकास महामंडळातील समस्या निकाली काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

बैठकीला एफडीसीएमचे मुख्य महाव्यवस्थापक मुख्यालय श्रीनिवास राव, यांच्यासह संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस रमेश बलैया, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, रवी रोटे, राहूल वाघ, अशोक तुंगीडवार, टी.एच. हरिणखेडे, विक्रम राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

ठळक मुद्देव्यवस्थापकीय संचालकांचे संघटनेला आश्वासन : कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेने वारंवार निवेदन दिले आहे. दरम्यान, नुकतीच वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रलंबित असलेल्या मागण्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन नागपूर एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा वाढल्या आहे. बैठकीला एफडीसीएमचे मुख्य महाव्यवस्थापक मुख्यालय श्रीनिवास राव, यांच्यासह संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस रमेश बलैया, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, रवी रोटे, राहूल वाघ, अशोक तुंगीडवार, टी.एच. हरिणखेडे, विक्रम राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, प्रोत्साहन भत्ता दिवाळीपूर्वी वितरण केल्याबद्दल व्यवस्थापकीय संचालकांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सातवा वेतन लागू करावा, कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता द्यावा, नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता द्यावा, रिक्त पदे तत्काळ भरावी, सुधारित शासन निर्णयाप्रमाणे एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रणीचा लाभ देवून एकतर पदोन्नतीचा वनविभागाप्रमाणे लाभ द्यावा, कर्मचारी, वनमजूर सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारस अनुकंपाधारकांना आस्थापनावर घ्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी सातवा वेतन लागू करण्याची कार्यवाही शासन स्तरावर प्रलंबित आहे. तत्काळ मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत असून मंजुरी मिळताच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, तसेच इतरही मागण्या त्वरित सोडविण्यात येईल, याबाबत संचालक मंडळाच्या सभेत ठराव पारित करून कर्मचाऱ्यांना न्याय देवू, असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटनेला दिले.

टॅग्स :forest departmentवनविभाग