शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जिनिंगधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

जिनिंग व प्रेसिंग युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जात नाही. यावरुन यापुढे या यंत्रणेला खासगी व हमीभाव दराने कापूस खरेदी करण्यात काही स्वारस्य नसल्याचे दिसून येते, असे म्हणत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या जिनिंगधारकांना नोटीस बजावून चांगलेच खडसावले. दोन दिवसात याबाबत स्पष्टीकरण आले नाही तर परवाना रद्द करून काळ्यात यादीत टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देहमीभावाने कापूस खरेदी न करणे भोवले : जिल्ह्यातील तीन जिनिंगला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील वैभव जिनींग अ‍ँन्ड प्रेसिंग पांढरपौणी ता. राजुरा, एन.डी. कॉटन इंडस्ट्रीज टेंबूरवाही ता. राजुरा, बालाजी जिनींग अ‍ँन्ड प्रेसिंग फॅक्टरी येन्सा ता. वरोरा या तीन जिनिंगने ५ जूनपर्यंत आपल्या जिनिंगचा सीसीआयशी करारनामा केला नाही. तसेच २८ मेपासून खासगी खरेदीसुध्दा बंद केली आहे. सदर जिनिंग खासगी, शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेत पूर्णपणे सहकार्य करीत नाही. जिनिंग व प्रेसिंग युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जात नाही. यावरुन यापुढे या यंत्रणेला खासगी व हमीभाव दराने कापूस खरेदी करण्यात काही स्वारस्य नसल्याचे दिसून येते, असे म्हणत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या जिनिंगधारकांना नोटीस बजावून चांगलेच खडसावले. दोन दिवसात याबाबत स्पष्टीकरण आले नाही तर परवाना रद्द करून काळ्यात यादीत टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ १४ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे भारतीय कपास निगम लिमिटेड व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. यांच्यातर्फे करण्यात येणारी कापूस खरेदी थांबविण्यात आलेली होती.२७ एप्रिल रोजी भारतीय कापूस पणन महामंडळ मर्यादित (सीसीआय) मार्फत पुन्हा कापूस खरेदी सुरु करण्यात आलेली आहे. लॉकडाऊनपासून खासगी खरेदी चालू आहे. या कार्यालयात आयोजित सभामध्ये आपणास सीसीआयशी करारनामा करुन हमीभावाने कापूस खरेदी करण्याबाबत वारंवार सूचित केले होते. तरीही या जिनिंगने हमीभावाने कापूस खरेदी केला नाही.शासनाच्या निर्देशानुसार तसेच सीसीआयचा करारनामा न करणे, युनिट पुर्ण क्षमतेने न चालविणे, हमीभावाने कापूस खरेदी न करणे व परिणामी शासकीय कापूस खरेदीत अडथळे निर्माण करणे इ.बाबीसाठी या तीनही जिनींगवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचा परवाना रद्द करुन कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे तत्काळ या जिनिंगनी तत्काळ आपले स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश डॉ. खेममार यांनी नोटीसमधून दिले आहे.

खासगी व्यापाऱ्यांकडून कमीच दरमागील अनेक दिवसांपासून कापूस विक्रीकरिता शेतकरी सीसीआय केंद्राजवळ भरलेल्या कापसाच्या बैलबंडी व मिनीडोअर रांगेत लावून ठेवत आहेत. आपला कापूस केव्हा विकला जाईल, याकडे शेतकरी नजरा लावून आहेत. मात्र मोजक्याच शेतकºयांच्या गाड्या या केंद्रावर घेतल्या जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले. अशात आता अनेक खासगी व्यापाºयांच्या जिनींगमध्ये हमीभावापेक्षाही कमी दर देऊन कापूस उत्पादकांची लूट केली जात आहे. लॉकडाऊनमुळे आधीच कोलमडलेल्या शेतकºयांना यामुळे आर्थिक फटका बसत आहे.धानोरा जिनिंगचा परवाना रद्दहमी भावानुसार कापूस खरेदी करण्याचे आदेश सीसीआय व सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने दिले होते. मात्र या आदेशाला धाब्यावर बसवून कापूस खरेदीकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर तालुक्यातील धानोरा येथील सोसायटी अ‍ॅग्रो प्रोसेसर्स इंडस्ट्रीजला नोटीस दिली होती. मात्र स्पष्टीकरण न आल्याने सोमवारी या जिनिंगचा परवाना रद्द केला आहे.