शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिशाली स्फोटांनी पोवनी गाव हादरतेयं

By admin | Updated: April 7, 2016 00:39 IST

वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी गावातील अनेक नव्या जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत.

लोकप्रतिनिधी लक्ष देईना : वेकोलिच्या मुजोर प्रशासनापुढे गावकरी हतबलप्रकाश काळे गोवरीवेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी गावातील अनेक नव्या जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत. वेकोलितील दुष्परिणामाचा नाहक फटका नागरिकांना बसत असून स्फोटांमुळे गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. जनतेचे सेवक समजले जाणारे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने गावकरी आता निराधार झाले आहेत.राजुरा तालुक्यातील गोवरी-कवठाळा या मुख्य मार्गावरील तालुका स्थळापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले पोवनी गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. सभोवताल कोळसा खाणी व मातीचे महाकाय ढिगारे असल्याने जवळ गेले तरी गाव दिसत नाही. मातीच्या ढिगाऱ्यावर वन्यप्राण्यांचा दिवस-रात्र हैदोस सुरू असतो. त्यामुळे गावकरी वैतागले आहेत. मातीचे ढिगारे हटविण्यासाठी गावातील ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वेकोलिला अनेकदा निवेदन दिले.मात्र वेकोलिच्या मुजोर प्रशासनाने आश्वासन देण्याखेरीज दुसरे काहीच केले नाही. वेकोलिच्या प्रतापाचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. गावकऱ्यांची ही आजची समस्या नाही तर ज्या दिवशीपासून वेकोलिचा कोळसा खाणीचे निर्माण झाले. तेव्हापासून वेकोलि प्रशासनाने गावकऱ्यांना वेठीस धरले आहे. मात्र जनतेचे सेवक समजले जाणारे मायबाप लोकप्रतिनिधी या नागरिकांच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही.पोवनी गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा मुख्य मार्गालगत आहे. या ठिकाणापासून कोळसा खाणीजवळ आहे. वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या ब्लॉस्टिंगचे आवाज विद्यार्थी व गावकऱ्यांच्या कानावर सारखे घोंगावत असतात. हे स्फोटाचे आवाज क्षणभर नागरिकांच्या काळजात धडकी भरविणारे आहे. या गावातील नागरिकांच्या जमिनी वेकोलिने कोळसा खाणीसाठी घेतल्याने जमिनीचा तुकडाही आता शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गावात राहून काय करायचे, या विचाराने बहुतांश नागरिकांनी शहराच्या ठिकाणी स्थानांतरण केले आहे. त्यामुळे गाव आता ओस पडायला लागले आहे. पूर्वी सारखी मजा आता गावात राहिली नसल्याचे गावकरी सांगतात.प्रस्तुत प्रतिनिधीने पोवनी गावाला भेट दिली असता वेकोलित घडवून आणल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे अनेक नव्या, जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेल्याचे दिसून आले. तर काही घरांच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर असल्याने कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. स्फोटांची तीव्रता इतकी असते की ब्लास्टिंगमुळे घरातील भांडी व घर अनेकदा हालत असल्याचे गावकरी सांगतात.गाव लहान असल्याने गावात विकासाची गंगा वाहने आवश्यक आहे. मात्र येथील चित्र उलट असून गावाला प्रशासनाकडून विकासासाठी तोकडा निधी मिळत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. गावातील ग्रामपंचायतीने आता लक्ष देणे सोडून दिल्याचे दिसते.