शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब

By admin | Updated: June 24, 2015 01:33 IST

शहरातील डॉ.आंबेडकर महाविद्यालय ते आकाशवाणी मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले खरे, परंतु ...

चंद्रपूर: शहरातील डॉ.आंबेडकर महाविद्यालय ते आकाशवाणी मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आले खरे, परंतु सिमेंटीकरण करण्यापूर्वी या रस्त्याच्या मधोमध असलेले खांब हटविण्याची गरज वीज वितरण कंपनीला वाटली नाही. परिणामी हे खांब अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी आकाशवाणी लगत रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबावर दुचाकी जाऊन आदळली त्यात वडिल व मुलगी असे दोघेही गंभीर जखमी झालेत. मुळात यासाठी वीज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. वीज वितरण कंपनीने वीज तारा ओढण्यासाठी वाट्टेल तेथे खांब उभे केले आहेत. सार्वजनिक रस्त्यावर खांब उभे करण्यापूर्वी वीज वितरणने कोणताही विचार केला नाही. अलीकडे महानगर पालिकेच्यावतीने रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी रस्त्यावर असलेले खांब हटविण्याची विनंतीही वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली. मात्र वीज वितरणने खांब हटविले नाहीत. ही प्रक्रीया अतिशय धिम्या गतीची असल्याने खांब हटण्याची प्रतीक्षा करून करून थकलेल्या कंत्राटदाराने आपले काम पूर्ण केले. आता रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी आकाशवाणी परिसरातील रहिवासी रमण लोखंडे व त्यांची मुलगी असे दोघे रात्रीच्या सुमारास दुचाकीने घराकडे जात होते. दरम्यान, आकाशवाणीच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिरासमोर रस्त्याच्या मधोमध असलेल्या वीज खांबावर त्यांची मोटारसायकल आदळली. त्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. या ठिकाणी नेहमीच अपघात घडत असून हे खांब हटविण्याची मागणी केशव आवारी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)