शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणोत्सवालाही स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

महाराष्ट्रात कोरोनाचे काही संशयित रूग्ण आढळल्याने राज्य शासन तसेच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. सोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रमांना स्थगीती दिली होती.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : तालुकास्तरावर शिक्षक, विद्यार्थ्यांनी केली होती जय्यत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविल्या जात आहे. यातीलच एक शिक्षणोत्सव हा उपक्रम १६ मार्चपासून तालुकास्तरावर व त्यानंतर २० मार्चरोजी जिल्हास्तरावर शिक्षण विभागाने आयोजित केला. मात्र जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे या उत्सवाला मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले यांनी पत्र काढून स्थगिती दिली आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे काही संशयित रूग्ण आढळल्याने राज्य शासन तसेच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. सोबतच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रमांना स्थगीती दिली होती. असे असले तरी १६ मार्चपासून तालुकास्तरावर होणाऱ्या शिक्षण महोत्सवासंदर्भात शिक्षण विभागाने कोणतेही पाऊल उचलले नव्हते. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.शुक्रवारी सकाळपर्यंत यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतेही आदेश मिळाले नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान, शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत या कार्यक्रमाला स्थगीती दिल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.कोलाम परिषद स्थगितआवारपूर : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिवती तालुक्यातील रायपूर (खडकी) येथे आयोजित करण्यात आलेली तिसरी कोलाम परिषद स्थगित करण्यात आली आहे. या परिषदेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयोजन समितीने कळविले आहे. येत्या १५ मार्चला या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माणिकगड पहाडावर वास्तव्य करून राहणाºया आदिम कोलामांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न म्हणून कोलाम विकास फाऊंडेशन या संस्थेने हा उपक्रम सुरु केला आहे. या सोहळ्यात परिसरातील हजारो कोलाम एकत्र येऊन आपल्या समस्या मांडतात. कोलामी संस्कृतीचे प्रदर्शनही यावेळी घडविले जाते.शिक्षकांनी व्यक्त केले समाधानराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारे जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता विकासासाठी शिक्षणोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रथम तालुकास्तरावर १६ मार्चपर्यंत आयोजन करण्यात येणार होते. यातील निवडक स्टॉलची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात येणार होती. मात्र सध्या परीक्षेचा कालावधी तसेच कोरोनामुळे सहभागी व्हायचे तरी कसे असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. आता मात्र स्थगिती मिळाल्यामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षणोत्सवाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक शिक्षणाधिकाºयांवर देण्यात आली होती.मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण देशात तसेच राज्यात आढळले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शिक्षणमहोत्सवाला पुढील काही दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली आहे.- राहूल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना