शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या धाडीत पावणेदोन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

ब्रह्मपुरी शहर व तालुक्यातील दारूविक्री व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्रि येऊन तहसीलदाराला निवेदन दिले होते. याची दखल घेऊन ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी नुकतीच विशेष पथके तयार करून शहरात व तालुक्यात छापे टाकण्याची कारवाई सुरू केली. पेठवार्ड येथील कन्हय्यासिंग भुराणी याच्या घरावर छापा टाकून देशी व विदेशी दारू हस्तगत केली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शहरासह तालुक्यातील विविध चार ठिकाणी पोलिसांनी रविवारी छापा टाकून पावणेदोन लाखांची दारू जप्त करून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.ब्रह्मपुरी शहर व तालुक्यातील दारूविक्री व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्रि येऊन तहसीलदाराला निवेदन दिले होते. याची दखल घेऊन ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी नुकतीच विशेष पथके तयार करून शहरात व तालुक्यात छापे टाकण्याची कारवाई सुरू केली. पेठवार्ड येथील कन्हय्यासिंग भुराणी याच्या घरावर छापा टाकून देशी व विदेशी दारू हस्तगत केली. मेंडकी येथील मनोज गजभिये हा मोहाची अवैध दारू विकत असल्याने त्याच्याकडून १५ लिटर मोहाची दारू जप्त केली. कळंबगाव येथील हत्यारसिंग दुधानी व अंबरसिंग दुधानी हे दोघे चिचखेडा कॅनलवर दारू विकत असल्याची माहिती मिळाली असता मोठ्या शिताफीने पिंपळगाव (खरकडा) येथील दोघांना ताब्यात घेतले. आरोपी नदी घाटावरून दुचाकीने देशी दारूची तस्करी करीत असल्याची कबुली दिली. दोघांची झडती घेतली असता दोन पोत्यात देशी दारूचे एकहजार बाटला हस्तगत लपवून ठेवल्याचे सांगितले. या चारही कारवायांमध्ये दुचाकीसह पावणेदोन लाखांची देशी दारू जप्त केली. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे व ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उपनी अश्विनकुमार खेडीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश बन्सोड, अख्तर सय्यद, कृणाल हेमके, शुभांगी शेमले, खंडूजी मुंडकर, पवन डाखरे, खुशाल उराडे, अनूप कवठेकर,संदेश देवगडे, उमेश बोरकर आदींनी केली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असताना गावागावांमध्ये दारू विक्री सुरू असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी महिलांनीही ठाण्यात केली होती हे विशेष.