शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

डम्पींगमधील प्लास्टिकही हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:11 IST

सध्या देश प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत मनपाने चंद्रपूर शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देमनपाचा पुढाकार : अंबुजाच्या कारखान्यात जळणार चंद्रपूरचे प्लास्टिक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या देश प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शासनाने धोरणात्मक पाऊल उचलले आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देत मनपाने चंद्रपूर शहरातील प्लास्टिक हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशातच शहरातील डम्पींग यार्डमध्ये लाखो टन प्लास्टिक पडून असल्याने त्यापासूनही पुढे चंद्रपूरकरांना धोका होऊ नये, यासाठी आता डम्पींग यार्डही प्लास्टिकमुक्त केले जाणार आहे. येथील प्लास्टिक आता अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये शास्त्रोक्त पध्दतीने जाळण्यात येणार आहे.चंद्रपूर शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी मनपाकडून जनजागृती केली जात आहे. प्रसंगी प्लास्टिक बाळगणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईदेखील केली जात आहे. असे असले तरी अद्याप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. येथील डम्पींग यार्डमध्ये वर्षानुवर्षापासूनचे लाखो टन प्लास्टिक पडून आहे. या प्लास्टिकमुळे प्रदूषण वाढून चंद्रपूरकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. जनावरांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे आता मनपाने डम्पींग यार्डमधील या अविघटनशिल कचºयाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे.महानगरपालिकेने अंबुजा सिमेंट लिमिटेडसोबत वेगवेगळ्या कोरड्या घनकचºयाची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी करार केला आहे. सदर कचरा अंबुजा सिमेंट कारखान्यात नेल्यावर १४०० डिग्री सेंटीग्रेड तापमानावर तो जाळण्यात येईल. शास्त्रोक्त पद्धतीने जाळल्याने हवामानावर त्याचा काही परिणाम होणार नाही. सिमेंट कारखान्याच्या भट्टीसाठी या इंधनाचा वापर करण्यात येतो, ज्याला रिफ्युज डिराईव्हड फ्युयल, असे म्हणतात. अंबुजा सिमेंट कारखान्याची भट्टी महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाच्या मानकाप्रमाणे प्रमाणित आहे. भविष्यात पर्यावरणपूरक हवामानाच्या दृष्टीने महानगरपालिका गतीने पाऊले उचलत आहे.प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेन्ट २०१६ च्या नियमांतर्गत प्लास्टिक किंवा थर्माकोल अशा अविघटनशील वस्तूंची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी मनपातर्फे डम्पींग यार्डवर जमा झालेल्या अविघटनशील कचºयाला अंबुजा सिमेंट कारखान्याला पाठविण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे.आज सोमवारी येथून प्लास्टिक घेऊन निघालेल्या पहिल्या वाहनाला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. महानगरपालिकेतर्फे अंदाजे दोन टन प्लास्टिक पहिल्या फेरीत पाठविण्यात आला. याप्रसंगी सहायक आयुक्त सचिन पाटील, धनंजय सरनाईक, शितल वाकडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी ( स्वच्छता ) नितीन कापसे, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी तसेच अंबुजा सिमेंटचे डॉ. मिश्रा व सुभाष ढवळे उपस्थित होते.प्लास्टिकमुक्त चंद्रपूरसाठी धाडसत्र व्यापक हवेशासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर पहिल्याच दिवशी चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील शंभर किलो प्लास्टिक जप्त करून व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्लास्टिकमुक्त शहरासाठी व्यापक नव्हती. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबविण्यात आले नाही. त्यामुळे प्लास्टिकचा वापर अजूनही शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मनपाजवळ मनुष्यबळ नाही, असे सांगितले जाते. मात्र खरेच प्लास्टिकमुक्त चंद्रपूर करायचे असेल तर मनपाने जादा कर्मचाऱ्यांचा ताफा या कामी लावणे आवश्यक आहे.या कचऱ्याचे होणार विघटनथर्माकोल, चप्पल, सॅन्डल, बूट, प्लास्टिक, चिंधी, कापड, रेग्झिन, टायरचे तुकडे, चामड्याचा कचरा, मल्टीलेअर प्लास्टिक, प्लास्टिक बाटल्स यासारखा अविघटनशील कचरा हा फक्त उच्च तापमानावरच जास्त वेळ ठेवल्याने विघटित होतो. भारतामध्ये, जिओसायकल ही कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लिमिटेडच्या सिमेंट भट्टीमध्ये सह-प्रक्रियेद्वारे टिकाऊ कचरा व्यवस्थापनाची सुविधा पुरवते. सहप्रसंस्करण तंत्रज्ञानाद्वारे कचºयाचे व्यवस्थापन एक सुरक्षित आणि पर्यावरणदृष्टया प्राधान्यकृत पर्याय म्हणून ओळखले जाते.