शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचा घामाचा पैसा तस्करांच्या घशात

By admin | Updated: January 5, 2017 00:55 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना जिल्ह्यातील बऱ्याच गावात दारू तस्कराकडून दारूचा महापूर वाहत आहे.

तेलंगणातील दारू : राजुरा-बल्लारपूर शहरात महापूर राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना जिल्ह्यातील बऱ्याच गावात दारू तस्कराकडून दारूचा महापूर वाहत आहे. मागेल त्याला दारू असा प्रकार सध्या सर्वत्र दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या निष्क्रीयतेमुळे तेलंगणा, मध्यप्रदेश, दमण, महाराष्ट्र राज्यातील परवानाधारकाकडून तस्कराच्या माध्यमातून दारूचा पुरवठा करून बिनधास्त विक्री सुरू आहे. विविध राज्याचे लेबल असलेल्या बॉटलमधली दारू असली की नकली याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस विभागाचे खुफीया, डि.बी. स्काट, पोलीस पाटील, पोलीस मित्र व खबरे यांच्या अनभिज्ञताबाबत जनतेत उलटसुलट चर्चा सुरू आहे. शासनाकडून दारूबंदीचा निर्णय घेताना आम जनतेच्या हिताचा विचार करण्यात आला होता. दारूमुळे बरेच कुटूंब उद्ध्वस्त झाले. घरातील वादात वाढ झाली. अशांततेच सर्वत्र वातावरण पसरले होते. त्यामुळे आम जनता व महिलांनी संघटित होवून शासनास दारूबंदी करण्यास भाग पाडले. शासनाचा निर्णय सार्थक ठरेल, असा विश्वास महिलांमध्ये निर्माण झाला होता. परंतु पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे विश्वासघात झाल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे. सध्या जिल्ह्यातील बऱ्याच गावात खुलेआम दारू विक्री सुरू आहे. राजुरा व बल्लारपूर शहरात तेलंगणा, मध्यप्रदेश, दमण व महाराष्ट्र राज्यातील दारूचा महापूर वाहत आहे. तस्करांना पोलिसांची भीती नाही, पोेलिसांची वचक फोल ठरली आहे. राजुरा व बल्लारपूर शहरात राज्यमार्ग व रेल्वेमार्गाने दारूची तस्करी सुरू आहे. त्यावर आळा घालणारे दुर्लक्ष करीत असल्यामुळे पुरवठा व विक्री सर्रास सुरू आहे. राजुरा व बल्लारपूर येथील ठोक व्यवसाय करणाऱ्यांनी मजुरी किंवा कमीशनवर युवकांना लावून जोमात विक्री करीत आहे. हा लपाछुपीचा विक्री धंदा पोलिसांच्या नजरेत का येत नाही, याबाबत आम जनतेत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ठोक विक्रेत्याकडून बॉटल घेवून अल्पशा लागवडीत मोठी नगदी कमाई होत असल्यामुळे या धंद्यात बऱ्याच युवकांनी भाग घेणे सुरू केले आहे. शहरातील धंदा पाहून बऱ्याच खेड्यातसुद्धा हाधंदा सुरू झाला आहे. जे वातावरण दारूबंदीपूर्वी होते तेच वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. शहरातील आड मार्गावर, सार्वजनिक मुत्रीघर, खेड्यातील रस्त्यावर, पडक्या घरात दारूच्या रिकाम्या बॉटल पडलेल्या दिसतात. फरक एवढाच पडला की अगोदर ४० रुपयात मिळणारी देशी दारूची बॉटल आता १५० रुपयात खरेदी करावी लागत आहे. मद्यपी लोकांना दारू पिणे आवश्यक असून त्यांना तिप्पट दराने रक्कम देवून आपली गरज पूर्ण करावी लागत आहे. दारूबंदीनंतरचा दारू तस्कराचा व्यवसाय बऱ्याच लोकांना लाभदायक ठरत आहे. बल्लारपूर शहरात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा सर्व मार्गानी सुरू आहे. याची जाणीव पोेलिसांना आहे. पोलीस मात्र वाहनाने फेरफटका मारताना दिसतात. कारवाई मात्र थातूरमातूर होत असल्यामुळे महिलांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. पोलिसांचे खबरे, पोलीस पाटील, खुफीया कर्मचारी कार्यरत असतानाही दारू विक्री होत आहे. (तालुका प्रतिनिधी) या भागातून होते दारूतस्करी तेलंगणा राज्यातील सिरपूर, कागजनगर, वाकंडी, आसिफाबाद, बैलमपल्ली, मंचेरियाल या भागातील परवानाधारक दुकानातील दारू तस्करीच्या माध्यमातून आणून विक्री सुरू आहे. तेलंगणातील ११० रुपयांची बॉटल २५० रुपयात बल्लारपूरात विक्री सुरू आहे व महाराष्ट्रातील १३० रुपयाची बॉटल (१८० मिली) ३०० रुपयात विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती पोलिसांना ठाऊक नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.