शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

निर्वाह भत्त्याची थकबाकी प्रलंबित

By admin | Updated: May 13, 2017 00:39 IST

वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर आगारातील वन कामगाराच्या निर्वाह भत्त्याची थकबाकी प्रलंबित असून ती तत्काळ देण्यात यावी, ....

बल्लारपूर आगार : वनविकास महामंडळाचे कर्मचारी लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर आगारातील वन कामगाराच्या निर्वाह भत्त्याची थकबाकी प्रलंबित असून ती तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ वन कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे. वनविकास महामंडळ बल्लारशा आगार विभागाअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांचा मेळावा मनीष चव्हाण यांच्या अध्यतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ वन कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहविडे व कामगार नेते बाबाराव मून उपस्थित होते.यावेळी प्रा. दहीवडे म्हणाले की, कामगारांनी दीर्घकाळ संघर्ष करुन आपले बलीदान देऊन अधिकार मिळविले ते अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न भांडवलदारधार्जिण्या शासनाकडून होत आहे. कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याऐवजी कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल केला जात आहे. अल्पशा मजुरीवर काम करणाऱ्या वनमजुरांना गेल्या १० वर्र्षापासून निर्वाह भत्याची थकबाकी देण्यात आलेली नाही. ती तत्काळ देण्यात यावी अन्यथा आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करण्यात येईल. देशाचे सर्वोच्च न्यायालय म्हणते समान कामास समान वेतन देण्यात यावे. समान वेतन देण्याऐवजी काम असतानाही कामगारांना कामावरुन कमी करण्याचा सपाटा सुरु झाला आहे. तो तत्काळ बंद करावा, अशी मागणीही प्रा. दहिवडे यांनी केली. प्रास्ताविक भाषणात बाबाराव मून म्हणाले की, कामगारांना त्यांच्या न्यायहक्कांपासून वंचित ठेवण्यासाठी ९० दिवस पूर्ण होताच काम असतानाही कामगारांना कामावरुन काढून टाका, असे कामगारविरोधी परिपत्रक असून ते तत्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. आभार प्रदर्शन नागेंद्र पाडाळे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्याकरिता आकाश मेश्राम, राजेश मानकर, सचिन उराडे, सुनील बरके, अरुण धकाते, मनोज बावणे, पराग कायरकर यांनी परिश्रम घेतले.